शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

गोंडपिंपरीत तणावपूर्ण शांतता

By admin | Updated: September 30, 2015 01:31 IST

येथील बाजार मार्गावरील हनुमान मंदिरातील हनुमान व शिवलिंगाची तोडफोड केल्याची घटना सोमवारी उघडकीस

गोंडपिंपरी : येथील बाजार मार्गावरील हनुमान मंदिरातील हनुमान व शिवलिंगाची तोडफोड केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. त्यामुळे संतप्त झालेल्या गोंडपिपरीवासीयांनी सोमवारी रास्ता रोको आंदोलन करून मुख्य मार्गावर टायर जाळून घटनेचा निषेध केला. मूर्ती विटंबना प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून मंगळवारी शहरात तणावपूर्ण शांतता दिसून आली.घटनेच्या निषेधार्थ सोमवारी शहरात कडेकोट बंद पाळण्यात आला. त्यामुळे पोलिसांचा ताफा शहरात दाखल झाला. नागरिकांच्या तीव्र संवेदना सुरु असताना येथील पोलीस शिपाई मनोज धकाते याने दबंगगिरी दाखवत निषेध मोर्चातील एका कार्यकर्त्यांच्या हातून झेंडा हिसकावून पायाने तोडला. त्यामुळे नागरिक आणखी आक्रमक झाले. ठाणेदार व पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यासाठी नागरिकांनी नारेबाजी केली. यादरम्यान आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी मध्यस्थी केली होती. या प्रकरणाची दखल घेत मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी गोंडपिपरीचे ठाणेदार अर्जुन बोत्रे व इतर चार पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी केली. तर मूर्ती विटंबना प्रकरणी गोंडपिपरी पोलिसांनी एकाला अटक केली असून अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने आपण गुन्हा केल्याची कबुली दिली असल्याचे पोलीस सांगत आहेत. मात्र अटक करण्यात आलेला व्यक्ती आरोपी नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तणाव शांत करण्यासाठी पोलिसांचा हा डाव असून मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)