शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांपासून वेतन अडले, प्राध्यापकांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2017 00:38 IST

बल्लारपूर इन्सिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हील इंजिनिअरिंग शाखेच्या

बीआयटीमधील प्रकार : ऐन परीक्षेच्या काळात संपाचे हत्यारचंद्रपूर : बल्लारपूर इन्सिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हील इंजिनिअरिंग शाखेच्या प्राध्यापकांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मागील सहा महिन्यांपासून वेतनच न झाल्याने हा मार्ग स्विकारावा लागला, असे या प्राध्यापकांचे म्हणणे आहे.मागील १७ मार्चपासून महाविद्यालयात हे आंदोलन सुरू असल्याने या विद्याशाखा विभागातील सर्वच शैक्षणिक कामे ठप्प पडली आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परिक्षेचा हा काळ असल्याने त्याचा परिणाम या परिक्षेवर पडत आहे. असे असले तरी अद्याप व्यवस्थापनाने या संदर्भात कसलीही दखल घेतली नसल्याचा आरोप प्राध्यापकांच्या गटाने केला आहे. सिव्हील इंजिनिअरिंग शाखेच्या सेक्रेटरीने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर-२०१६ पासून या प्राध्यापकांचे वेतन व्यवस्थापनाने अडविले आहेत. त्यामुळे आपले संसार चालवायचे तरी कसे, असा या प्राध्यापकांचा प्रश्न आहे. मागील सहा महिन्यापासून वेतन अदा न झाल्याची कल्पना संस्थाचालकांना आहे. या संदर्भात वारंवार विनंती करून आणि निवेदनेही संस्थाचालकांना देण्यात आली आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी पाच महिन्यानचे वेतन अडले असताना या प्राध्यापकांनी १५ दिवसांचा संप केला होता. यावेळी संपावर जाण्यापूर्वी एक दिवसांचा नोटीस देवून हे प्राध्यापक संपावर गेले आहेत. वेतनाच्या प्रश्नावर साफ दुर्लक्ष केल्याने कुटुंबाच्या पोषणासाठी नाईलाजाने हे पाऊल उचलावे लागल्याचे या प्राध्यापकांचे म्हणणे आहे. या संपाचा परिणाम शैक्षणिक कार्यावर पडल्याने ऐनवेळी अपात्र प्राध्यापकांंच्या नियमबाह्य नियुत्या करून काम ढकलण्याचा प्रकार संस्थेने केल्याचा प्राध्यापकांचा आरोप आहे. विद्यार्थ्यांची कसल्याही स्वरूपाची प्रात्यक्षिक परीक्षा न घेता अथवा प्रोजेक्ट्स पूर्ण करून न घेता विद्यार्थ्यांना सरसकट गुण दिले जात आहेत. हा प्रकार नियमबाह्य असून विद्यापिठाच्या डोळ्यात धुळ झोकणारा असल्याने या गंभीर प्रकाराची दखल मुख्यमंत्र्यांनी घेण्याची विनंती या प्राध्यापकांनी निवेदनातून केली आहे. आपला संप योग्य कारणासाठी असला तरी तो दडपण्याचा संस्थाचालकांचा प्रयत्न असल्याचा आरोप या प्राध्यापकांनी केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)संपामुळे काम थांबलेले नाही, अन्य प्राध्यापकांकडून सुरु आहे. संबंधित प्राध्यापक नोटीस न देता कामावरून निघून गेले. शासनाचा निधी न मिळाल्याने वेतन देता आले नव्हते. मात्र आता निधीची व्यवस्था झाली आहे. त्यामुळे लवकरच वेतन देता येईल. त्यांनीही परीक्षकाळात संपावर जायला नको होते.- अ‍ॅड.बाबासाहेब वासाडे, सचिव, बल्लारपूर इन्सिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी