जलजन्य आजाराकडे वेळीच द्या लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:35 IST2021-09-10T04:35:17+5:302021-09-10T04:35:17+5:30
गोलबाजारात सुविधांचा अभाव चंद्रपूर : शहरात अनेक वर्षांपासून सुरू असलेला गोलबाजार जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या बाजारात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांची ...

जलजन्य आजाराकडे वेळीच द्या लक्ष
गोलबाजारात सुविधांचा अभाव
चंद्रपूर : शहरात अनेक वर्षांपासून सुरू असलेला गोलबाजार जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या बाजारात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या बरीच आहे. किराणा ते भाजीपाल्यापर्यंतच्या सर्वच वस्तू या बाजारात विकत घेता येतात. कापड तसेच अन्य दुकानांची संख्या वाढल्याने ग्राहकांची दरदिवशी मोठी गर्दी होत आहे.
सर्व वस्तू एकच ठिकाणी मिळणाऱ्या गोल बाजारात मूलभूत सुविधा नाही. येथील व्यावसायिक सकाळ पासून तर सायंकाळपर्यंत दिवसभर व्यवसाय करताना दुकानदारांना त्रास होतो़. त्यामुळे येथे सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
ग्राहकांच्या प्रबोधनाची आवश्यकता
चंद्रपूर : दिवसागणिक विविध जीवनोपयोगी इलेक्ट्रॉनिक साधनांची व वस्तुंची निर्मिती होत आहे. ती वापरण्याकडे ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात कल आहे. मात्र त्या वस्तूमुळे अचानक काही धोकादायक प्रसंग निर्माण झाल्यास त्याबाबत घेण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत आजसुद्धा अनेक ग्राहक अनभिज्ञ आहेत. त्यामुळे सुरक्षेबाबत ग्राहकांच्या प्रबोधनाची गरज आहे.