शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

फुटपाथ विक्रेत्यांना ओळखपत्र द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:41 IST

ओळखपत्र द्यावे चंद्रपूर : शहरातील फुटपाथवर व अनेक ठिकाणी लघु व्यवसाय करण्याºयांची संख्या वाढली. व्यावसायिकांकडून मनपा कर वसूल करीत ...

ओळखपत्र द्यावे

चंद्रपूर : शहरातील फुटपाथवर व अनेक ठिकाणी लघु व्यवसाय करण्याºयांची संख्या वाढली. व्यावसायिकांकडून मनपा कर वसूल करीत आहे. काही महिन्यांपूर्वी मोहीम राबवून ओळखपत्र दिले जात होते. पण, अचानक बंद करण्यात आले. त्यामुळे शासनाकडून विविध योजनांचा लाभ मिळणे कठीण झाले. शहरातील व्यवसायिकांना ओळखपत्र देण्याची मागणी केली जात आहे.

ग्रामीण रस्त्यांची

दुरुस्ती करावी

सावली : तालुक्याला जोडणाºया ग्रामीण भागातील विविध रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डेमुक्त रस्ते मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, गावखेड्यांतील रस्त्यांची थातूरमातूर कामे केल्याने दैनावस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले. त्यामुळे ये-जा करणाºयांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

कडाक्याच्या थंडीने

तालुक्यात हुडहुडी

राजुरा : तालुक्यातील तापमानाचा पारा घसरल्याने कडाक्याची थंडी सुरू झाली. मागील आठवड्यापासून वातावरणात सतत गारवा कायम आहे. सकाळी धुकी दिसून येत आहेत. थंडीमुळे काहींना सकाळी बाहेर निघणे कठीण झाले. मात्र, हाच ऋतु प्रकृतीसाठी उत्तम असल्यान फिरणाºयांच्या संख्या लक्षणीय झाली आहे.

विनापरवाना वाहने

चालवू नका

चंद्रपूर : दिवसेंदिवस वाहनधारकांची संख्या वाढत आहे. मात्र, अनेकांजवळ वाहन चालविण्याचा परवाना नाही. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने जिल्हा कार्यालयात विशेष शिबिर करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी विना परवाना वाहन न चालविता प्रशिक्षण घेऊन परवाने प्राप्त करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रस्त्यावरील वाहनांमुळे

नागरिकांना अडचण

मूल : शहरातील गांधी चौक व अन्य वार्डांतील चौकात वाहने ठेवण्याचे प्रकार वाढीस लागले. त्यामुळे नागरिक व वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.प्रत्येक वार्डात स्वच्छता कर्मचारी दैनंदिन स्वच्छता करीत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येत आहेत.

ज्युबिली हॉयस्कूलसमोर गतिरोधक तयार करा

चंद्रपूर : येथील कस्तुरबा मार्गावरील ज्युबिली हॉयस्कूलजवळ गतिरोधक नसल्याने अपघात होत आहेत. या रस्त्यावर एकही गतिरोधक नाही. त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत बांधकाम विभागाने या रस्त्यावर गतिरोधक तयार करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शहरातील वर्दळीच्या

मार्गावर कचरा

चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील वर्दळीच्या फुटपाथवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार वरिष्ठांचे लक्ष वेधले. मनपाचेही लक्ष वेधले. मात्र कुणीही लक्ष दिले नाही

तुकूम परिसरातील

नाल्यांचा उपसा करावा

चंद्रपूर : तुकूम परिसरातील विविध वार्डात घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वॉर्डातील नाल्यांचा उपसा होत नाही. त्यामुळे तुडुंब भरल्या आहेत. घाणीमुळे रोगराई पसरू शकते. डासांचे प्रमाण वाढून आजार होवू शकतात. त्यामुळे मनपाने स्वच्छता कर्मचाºयांना तातडीने वॉर्डात पाठवावे. तसेच रस्त्यावर कचरा टाकणाºया नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

अनेक प्रभागात मोकाट कुत्र्यांचा हैदोस

चंद्रपूर : शहरातील अनेक प्रभागात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरू आहे. बल्लारपूर मार्गावरील बंगाली कॅम्प पोलीस ठाणेलगतच्या उड्डाण पुलावर मोकाट कुत्र्यांचा ठिय्या असतो. रात्री या मार्गावरून गेल्यास पाठलाग करण्याच्या घटना वाढू लागल्याने नागरिक हैराण झाले़ यासोबतच पठाणपुरा, हॉस्पीटल वार्ड, रामनगर आदी परिसरातही मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे.