शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
4
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
5
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
6
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
7
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
8
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
9
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
10
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
11
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
12
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
13
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
14
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
15
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
16
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
17
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
19
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
20
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी वाहन चालक-मालकांच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:27 IST

मागील एक वर्षापासून टाळेबंदीमुळे खासगी प्रवासी वाहन व्यवसाय डबघाईस आला. त्यामळे त्यांनी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान यांची भेट ...

मागील एक वर्षापासून टाळेबंदीमुळे खासगी प्रवासी वाहन व्यवसाय डबघाईस आला. त्यामळे त्यांनी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान यांची भेट घेतली. इम्रान खान यांनी पुढाकार घेऊन लगेच माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांना खासगी प्रवासी वाहन चालक-मालकांच्या समस्या समजावून सांगितल्या. तसेच या खासगी वाहन चालक-मालकांनी आ. मुनगंटीवार यांना एक निवेदन सादर केले. या निवेदनाची आ. मुनगंटीवार यांनी तातडीने दखल घेऊन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांना खासगी प्रवासी वाहन चालक-मालकांच्या समस्या अवगत करून त्यांच्या मागण्या मान्य करण्याची विनंती केली. तसेच तातडीने ऑनलाईन बैठकीचे आयोजन करून परिवहन आयुक्त ढाकणे यांच्यासोबत चर्चा केली. याशिवाय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तातडीने पत्र पाठवून खासगी प्रवासी वाहन चालक-मालकांना आर्थिक साहाय्य, करमाफी, विमा मुदतवाढ, बॅँक हप्त्यांना बिनाव्याजी मुदतवाढ, आदी मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली.

परिवहन आयुक्त ढाकणे यांनी ऑनलाईन बैठकीत पूर्ण वर्षाचा कर माफ करण्याबाबत आपण त्वरित शासनाला प्रस्ताव सादर करू असे आश्वासन दिले. शाळा सुरूच न झाल्यामुळे स्कूल बस आणि स्कूल व्हॅन यांच्यावरील कर माफ करण्याबाबत आपण प्रस्ताव पाठविला आहे, अशीही माहिती ढाकणे यांनी यावेळी दिली.