शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

प्रवाशांनी बसस्थानके गजबजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 21:50 IST

दिवाळीनिमित्त गावाला अथवा अन्य शहरात जाण्यासाठी प्रवाशांनी जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांवर मोठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. प्रवास करणाऱ्यांमध्ये विशेषत: महिलांची संख्या लक्षणीय आहे. प्रवाशांची वाढती संख्या बघता एसटी महामंडळाने विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जादा बसेस सोडल्या आहेत.

ठळक मुद्देदिवाळी, भाऊबीजची लगबग : परिवहन मंडळाकडून विविध मार्गांवर जादा बसेसची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दिवाळीनिमित्त गावाला अथवा अन्य शहरात जाण्यासाठी प्रवाशांनी जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांवर मोठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. प्रवास करणाऱ्यांमध्ये विशेषत: महिलांची संख्या लक्षणीय आहे. प्रवाशांची वाढती संख्या बघता एसटी महामंडळाने विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जादा बसेस सोडल्या आहेत.लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज आणि जोडून असलेला शनिवार व रविवारमुळे नोकरदार, कामगार वर्गाने गावाकडची वाट धरली आहे. परिणामी, शनिवारपासून चंद्रपूरसह बल्लारपूर, राजुरा, चिमूर, गोंडपिपरी, भद्रावती, वरोरा, ब्रह्मपुरी, सिंदेवाही नागभीड बसस्थानके गर्दीने फुलून गेली होती. नागपूर, पूणे व अन्य मार्गावर धावणाºया शिवशाहीचे तिकीट मिळवण्याकरिता नागरिकांनी रांगेत ताटकळत उभे राहावे लागल्याचे चित्र पहिल्यांदाच पाहायला मिळाले. नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ येथे जाणाºया बसेसही अवघ्या काही मिनिटांतचे हाऊसफुल्ल होत असल्याचे दिसून येत आहेत. ब्रह्मपुरीकडे जाणाºया सर्वच बसेस मागील दोन दिवसांपासून फुल्ल भरून जात आहेत. भाऊबीज सणानिमित्त महिला प्रवाशांची मोठी लगबग दिसून सोमवारपासून नियमितपणे शासकीय कार्यालये सुरू होणार आहेत. बरेच कर्मचारी तालुका व जिल्हास्थळावरून दररोज ये-जा करतात. परिणामी एसटी महामंडळाने त्यादृष्टीनेही काही मार्गांवर जादा बसेसची तयारी केली आहे. एसटी महामंडळाच्या बसस्थानकांवर एकीकडे गर्दी असताना शेकडो प्रवाशांनी खासगी ट्रॅव्हल्सद्वारे प्रवास करणाऱ्याला पसंती देत आहेत. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी बसेसची संख्या वाढवून तिकीट दरातही नेहमीपेक्षा नवे दर लागू केले आहेत.हंगामी दरवाढीतही गर्दीऐन दिवाळी, भाऊबीज सणाच्या आगमनापूर्वीच राज्य परिवहन महामंडळाने तिकिट दरामध्ये १० टक्क्याने वाढ केली. ही भाडेवाढ २० नोव्हेंबरपर्यंत कायम राहणार आहे. दिवाळी व भाऊबीजला स्वत:च्या गावाला जाण्यासाठी अन्य पर्याय नसणारे प्रवाशी जादा तिकीट देऊन एसटीचा प्रवास करत आहेत.रेल्वेही झाल्या फुल्लबसप्रमाणेच नागरिकांनी रेल्वे प्रवासालाही पसंती दिली. त्यामुळे आंध्र प्रदेश, पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकत्ता मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये पाय ठेवायलाही जागा नाही. दिवाळीची धामधूम लक्षात घेऊन रेल्वे विभागाने दक्षिण व उत्तरेकडे धावणाºया गाड्यांमध्ये वाढ केली आहे.