पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटी चंद्रपूरतर्फे गुरुवारी सायकल मोर्चा काढून भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला. ...
नऊ सदस्य असलेल्या चिरोली ग्रामपंचायतीमध्ये ना सरपंच आहे ना उपसरपंच. या दोन्ही महत्त्वाच्या पदाविना ही ग्रामपंचायत पोरकी झाली असून त्याचा गावविकासावर विपरित परिणाम होत आहे. ...
मागील दोन महिन्यांपासून मूरमाडी, किन्ही गाव परिसरात पट्टेदार वाघाची दहशत सुरू आहे. या वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा, या मागणीसाठी दोन्ही गावातील शेकडो ग्रामस्थांनी गुरुवारी येथील तहसील कार्यालयावर धडक दिली. ...
कुठलीही ई-निविदा प्रक्रिया न राबविता एका कंत्राटदारांकडून वैद्यकीय महाविद्यालयात २३६ कामगारांची नियुक्ती केली. या कामगारांना केवळ पाच हजार रुपये वेतन देऊन किमान वेतन कायद्याची पायमल्ली केली जात आहे. ...
शासनाने अखेर घोडाझरीला अभयारण्याचा दर्जा बहाल केला आहे. घोडाझरीतील नैसर्गिक साधन संपत्ती, वन्यप्राण्यांचा वावर आणि नैसर्गिक सौंदर्य लक्षात घेता हे अभयारण्य महाराष्ट्रातील सर्वोत्तम अभयारण्य ठरेल, असा विश्वास या भागात व्यक्त होत आहे. ...
डम्पींग यार्डमधील कचरा प्रक्रियेसाठी अंबुजा कंपनीला देणे, पदाधिकाऱ्यांच्याच प्रभागात नगरोत्थानचा निधी देणे आणि मूल मार्गाला जोडणाऱ्या बायपास रोडला मंजुरी देणे, या तीन विषयांवरून मनपाच्या बुधवारी झालेल्या आमसभेत चांगलाच गदारोळ झाला. ...