चिरोली येथील उध्दव शेंडे या युवकावर चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य उपचार न झाल्याने त्याला मूल येथे नेताना वाटेतच मृत्यू झाला. यामुळे संतप्त नागरिकांनी चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. ही घटना मंगळवारी घडली. ...
शहरातील रस्त्यांचे बांधकाम करणारे कंत्राटदार आणि अभियंत्यांची नावे, मोबाईल क्रमांकाचा उल्लेख असणारे फलक त्या रस्त्यावर लावावे, या मागणीसह विविध समस्यांना घेऊन चंद्रपूर बचाव संघर्ष समितीतर्फे आयुक्तांना निवेदन देण्यात आले. दरम्यान आयुक्तांंनी समस्या स ...
शहरात विविध चौकांमध्ये पुतळे उभारणे, मुख्य मार्गावरील रस्ते रूंदीकरणासाठी फुटपाथ तोडून नव्याने बांधणे आणि शहरातील अनेक भागात प्रलंबित असलेले गुंठेवारी प्रकरण आणि रिंगरोड संदर्भातील विषयांवर मंगळवारी पार पडलेल्या चंद्रपूर महानगर पालिकेच्या सर्वसाधारण ...
अतिदुर्गम व संवेदनशील जिवती तालुक्याच्या विकासासाठी राज्याचे अर्थ, नियोजन वने तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दहा कोटींचा निधी मंजूर केला आहेत, अशी माहिती जिवती नगर पंचायतचे नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी ...
गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता मागील काही दिवसांपासून व्यक्त होत आहेत. तसेच काही ठिकाणी ही अळी आढळून येत असल्याबाबतच्या सूचनाही कृषी विभागाला मिळाल्या आहेत. ...
पावसाळ्याच्या तोंडावर वडगाव परिसरात मागील काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, या मागणीचे निवेदन नागरिकांनी मनपा आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना ...
बल्लारपूर वेकोलि खुल्या खाणीत कोळसा खननाचे काम सुरु असताना ३५ लाखांचा डम्पर जळून खाक झाल्याची घटना रविवारी दुपारी २.३० च्या सुमारास घडली. डम्परची नियमित तपासणी होत नसल्याने ही घटना घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...
शाळाबाह्य मुलांची गळती थांबविण्यासाठी आणि गोरगरिबांच्या मुलांना गावातच मोफत शिक्षण मिळावे म्हणून शासनाने गाव तिथे शाळा उघडल्या, परंतु शिक्षण विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे पहाडावरिल अनेक शाळांमध्ये शिक्षकांची बोंब आहे. याचा फटका विध्यार्थ्यांना बसत आहे ...
मूल आणि सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने वाघोली बुटी उपसा सिंचन योजनेचे पाणी कालव्याद्वारे सोमवारी सोडण्यात आले. सावली तालुक्यातील वाघोली बुटी उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्य ...