तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान पेरजागड येथे महाप्रसादाचा स्वयंपाक करण्यास निर्बंध घालण्यात आल्याने भाविकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिकांना याठिकाणी स्वयंपाक करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात आहे. ...
पुण्याचे नाव बदलून जिजापूर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने रेटली आहे. त्यापाठोपाठ आता गोंड राजाची राजधानी असलेल्या चंद्रपूरचेही मूळ नाव चांदागढच करावे, अशी मागणी आदिवासी संघटनांकडून पुढे करण्यात आली आहे. ...
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यात कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. यावेळी जिल्ह्यात ३८२ नवीन कुष्ठरूग्ण मिळाल्याची माहिती पुढे आली. कुष्ठरोग निर्मूलनाकरिता सुरू केलेली शोधमोहीम, सर्वेक्षण आणि कुष् ...
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या युनिट क्र. १ ते ९ एडीपीएल व उर्जानगर वसाहत परिसरात मोकाट गुरे-ढोरे व पाळीव जनावरांचा वावर वाढल्यामुळे बऱ्याचदा कर्मचारी व पाल्यांचा अपघात झाला. मोकाट अथवा पाळीव जनावरांमुळे विद्युत केंद्राच्या परिसरात पट्टेदार व ...
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या या निवडीच्या प्रवर्गानुसार होणार आहेत. यामुळे प्राथमिक शिक्षकांची बिंदूनामावली अद्ययावत होत नाही अथवा त्याला मागासवर्ग कक्ष आणि विभागीय आयुक्तांकडून मान्यता मिळत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदांमध्ये अन्य जिल्हा परिषदांमधून ...
चंद्रपूरच्या तुकुम परिसरात एका घरासमोर ठेवलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून तब्बल ३१ तोळे सोने उडविल्याची खळबळजनक घटना बुधवारी उघडकीस आली. या सोन्याची अंदाजे किमत १० लाख रुपये असल्याचे समजते. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपव ...
नागभीड रेल्वे जंक्शनने मंगळवारी खरोखरच प्रवाश्यांची गर्दी अनुभवली. रेल्वेचे दोन्ही प्लाटफार्मवर प्रवाशांची गर्दी ओसंडून वाहत होती. आज बुधवारीदेखील अशीच परिस्थिती होती. ...
देशातील ग्रामीण भागातील होतकरू तरूणांमध्ये कौशल्याची भरमार आहे. मात्र त्यांना रोजगाराची प्रत्यक्ष संधी मिळत नाही. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बेरोजगारीवर मात करण्यासाठी बेरोजगारीवर मात करण्यासाठी अनेक अभिनव उपक्रम सुरू केले आहेत. ...