चंद्रपूर-मूल महामार्गाच्या बांधकामात चंद्रपूर महानगराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन विस्कळीत झाली. यामुळे शहरातील पाण्याच्या टाकीपर्यंत पाणीच पोहचणे बंद झाले आहे. ही पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी किमान दोन दिवस लागतील. परिणामी चार दिवस चंद्रपूरकर ...
चालू सत्रापासून जिल्ह्यातील तब्बल २५० विद्यालयांमध्ये इयत्ता ११ व १२ वी विज्ञान विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक प्रणाली सुरु करण्यात येणार आहे. यासाठी विविध विद्यालयांमध्ये मशीनही बसविण्यात आल्याने विद्यार्थ्यांना येता-जाता या मशीनवर हजेरी लावावी लागणा ...
चंद्रपूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची समस्या व दुष्काळ निवारण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिलेत. त्यांनी जिल्ह्यातील पाच तालुक्यातील सरपंचांशी थेट मंत्रालयातून संवाद साधला. मुख्यमंत ...
भारताचा या टोकापासून त्या टोकापर्यंतच्या उत्तर-दक्षिण उल्लेख करताना हिमालय ते कन्याकुमारी असे आपण म्हणत असतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचा या टोकापासून त्या टोकापर्यंतचा विस्तार उल्लेखताना चांदा ते बांदा असे राज्यात सर्वत्र म्हटले जात असते. ...
जिल्ह्यातील दी सेंचुरीटेक्स माणिकगड सिमेंट कपनीने कुसुंबी येथील आदिवासी कुटुंबाची जमीन हस्तांतरित केली. मात्र त्यांचे पुनर्वसन केले नाही. परिणामी सर्व कुटुंब उघड्यावर पडले. त्यामुळे या कुटुंबाचे पुनर्वसन करण्याच्या मागणीचे निवेदन आमदार संजय धोटे यांच ...
सद्या जिल्ह्यातील इंग्रजी व सेमी इंग्रजी शाळांमध्ये नर्सरी ते पहिलीच्या प्रवेशासाठी पालकांची लगबग सुरू झाली आहे. पाल्यांच्या प्रवेशासाठी पालक शाळांमध्ये चकरा मारत आहेत. परंतु इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी प्रवेशासाठी वाढविलेल्या भरमसाठ शुल्कामुळे पालक ...
जिल्ह्याचे प्रमुख पीक असलेल्या कपाशीची हंगामपूर्व लागवड केल्यास गुलाबी बोंअडळीचा धोका कायम राहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीची हंगामपूर्व लागवड टाळावी. शिफारस केलेल्या कमी कालावधीच्या पक्व होणाºया बीटी कापूस अथवा सरळ वाणांची जून महिन्यात जमिनीत प ...
सर्वत्र प्रगती- विकासाच्या वल्गना होत असताना दुसऱ्या बाजूला वर्षानुवर्षे हातात हातोडा घेऊन रखरखत्या उन्हात खडी फोडणाºया वडार समाजाच्या समस्या मात्र अद्यापही सुटलेल्या नाही. त्यामुळे आतातरी या समाजाच्या समस्या सोडवून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी के ...
जिल्ह्यात वन्यप्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्यामुळे शेतकरी नगदी पिकांकडे पाठ फिरवू लागला आहे. वारंवार घडणाºया वन्यप्राण्यांच्या घटनांमुळे शासनाकडून कोणतीच ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. वनविभागाचे वारंवार उंबरठे झिजवूनही शेतकऱ्यांना ...