शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार कृषिपंप वीज जोडण्या पेडिंग

By admin | Updated: June 1, 2015 01:19 IST

कृषी व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न सुरू असले तरी शासनाचे धोरणच सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यात आडकाठी आणत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मंगेश भांडेकर  चंद्रपूरकृषी व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न सुरू असले तरी शासनाचे धोरणच सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यात आडकाठी आणत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कृषी पंपाच्या साह्याने शेती सिंचीत करून उत्पन्न घेता यावे यासाठी अनेक शेतकऱ्यांनी वीज वितरणकडे अर्ज केले, पैसे भरले. मात्र वीज वितरणच्या धोरणामुळे जिल्ह्यातील तब्बल ४०२७ शेतकऱ्यांना कृषी पंप वीज कनेक्शनसाठी वेटींगवर राहण्याची पाळी आली आहे. अधिकाधिक शेतजमीन सिंचनाखाली आणून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. अशातच शासनाने विविध योजनाही शेतकऱ्यांसाठी सुरू केल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय नाही, त्यांना कृषी विभागामार्फत आॅईल इंजिन, कृषी पंप असे साहित्य दिले जात आहे. मात्र वीज कनेक्शनसाठी दोन ते तीन महिन्यांचा नाही तर चक्क तीन ते चार वर्षांचा कालावधी लागत आहे.३१ मार्च २०१४ पर्यंत जिल्ह्यातील २७५४ कृषी पंपधारक शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत होते. २०१४-१५ या वर्षांत पून्हा ३९२९ शेतकऱ्यांनी कृषी पंप वीज जोडणीसाठी अर्ज केले. यापैकी २६५६ शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली. तर ४०२७ शेतकऱ्यांना पैसे भरूनही वेटींगवर ठेवण्यात आले आहे. शेतकरी वीज कनेक्शनसाठी वीज वितरण कार्यालयाचे उंबरटे झिजवत असून त्यांना अद्यापही वीज जोडणी मिळालेली नाही. उत्पादन वाढवायचे तर कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत असून डिमांड भरून वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना जोडणी देण्याची मागणी आहे. उत्पन्न वाढीचे स्वप्न भंगलेनिसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी पंप वरदान ठरत आहेत. हवे त्या वेळी कृषी पंपाद्वारे पाणी देता येते. मात्र वीज वितरणच्या कारभारामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीचे स्वप्न भंगले आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना शेतजमीन सिंचीत करण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. पावसाळा व दुर्गम भागामुळे अडचणी कृषी पंपाच्या वीज जोडण्या प्रलंबित राहण्यासाठी पावसाळा व दुर्गम भाग यामुळे अडचणी येत असल्याचे वीज वितरण कंपनीने म्हटले आहे. वीज खांब पंपापर्यंत नेण्यासाठी हिवाळ्यात व पावसाळ्यात अडचणी येतात, तर विद्युत तारा पसरविण्यासाठीही अडचणी येत असल्याचे वीज वितरणने म्हटले आहे. कंत्राट प्रक्रियेने होणार वीज जोडण्यावीज जोडण्या देण्याचे काम हे कंत्राट पद्धतीने करण्यात आले आहे. कंत्राटदारांची नेमणूक करून कामे सोपविण्यात आली आहेत. लवकरच वीज जोडण्या पूर्ण होतील असे वीज वितरणचे म्हणणे आहे. मात्र वारंवार विनवणी करूनही कंत्राटदार जोडणी देण्यास दुर्लक्ष करीत असल्याचे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.