शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लस देण्यासाठी अडीच हजारांवर कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 05:00 IST

कोविडवरील लसीकरणासाठी निवड करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लवकरच या प्रशिक्षणाला सुरूवात होणार आहे. ही लस किती तापमानात ठेवायची, लसीची तालुका पातळीवर वाहतूक कशी करायची, लस इंजेक्शन स्वरुपात असल्याने ती मोहिमेत सहभागी कर्मचाऱ्यांना योग्य पध्दतीने कशी देता येईल आदी बाबी शिकविल्या जातील.

ठळक मुद्देप्रशिक्षणाला लवकरच सुरुवात : आरोग्य विभागाकडून नियोजन

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संसर्गावर प्रतिबंधात्मक लस लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही लस आलीच तर ती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचेल, यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. यासाठी जिल्ह्यात सुमारे अडीच हजारांवर कर्मचाऱ्यांची फौज तयार केली जात आहे.लसीकरणासाठी तयार होत असलेल्या पथकांमध्ये वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी, परिचारिका, पर्यवेक्षक, प्रशासकीय कर्मचारी यांचा समावेश आहे. ही लस इंजेक्शन स्वरुपात असणार आहे. याशिवाय या लसीला ८ डिग्री सेल्सीयस तापमानात ठेवावे लागणार आहे. त्यामुळे तशा प्रकारच्या रेफ्रीजरेटर्सची व्यवस्था आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, एकाच वेळी दोन लाख लसींचा साठा करता येऊ शकेल, अशीही व्यवस्था आरोग्य विभागाने केली आहे.

केंद्र शासनाकडून मिळणार प्रशिक्षणकोविडवरील लसीकरणासाठी निवड करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लवकरच या प्रशिक्षणाला सुरूवात होणार आहे. ही लस किती तापमानात ठेवायची, लसीची तालुका पातळीवर वाहतूक कशी करायची, लस इंजेक्शन स्वरुपात असल्याने ती मोहिमेत सहभागी कर्मचाऱ्यांना योग्य पध्दतीने कशी देता येईल आदी बाबी शिकविल्या जातील.

सर्वात आधी लस १५,७०० जणांनाकोरोना संसर्गावर प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम जेव्हा चंद्रपूर जिल्ह्यात सुरू होईल, तेव्हा सर्वप्रथम ही लस १५ हजार ७०० लोकांना दिली जाणार आहे. यात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, परिचारिका व आरोग्य विभागाशी संबंधित फ्रंट लाईनवर काम करणाºयांचा समावेश असणार आहे. त्याचा डेटा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे.ग्रामीण स्तरापर्यंत जाणार लस जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कोराना लसची ग्रामीण स्तरापर्यंत वाहतूक व साठा करण्याबाबत सध्या उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती नुकतीच जाणून घेतली. जिल्ह्यात सध्या एकाचवेळी इतर लसीव्यतिरिक्त कोविडच्या दोन लाख लसींचा साठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यावर त्यांनीही समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागात विहित तापमान मर्यादेत लस पोहचविली जाईल.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या