शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

वरोऱ्यातील १६१३ कुटुंब शौचालयाविना

By admin | Updated: March 11, 2016 01:25 IST

काही वर्षापूर्वी वरोरा नगरपालिकेला दोनदा संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचा पुरस्कार मिळाला होता.

वरोरा : काही वर्षापूर्वी वरोरा नगरपालिकेला दोनदा संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचा पुरस्कार मिळाला होता. या पुरस्कार प्राप्त पालिका हद्दीत आजही १६१३ कुटुंबाकडे शौचालय नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. या कुटुंबातील सदस्य उघड्यावर शौचास जात असल्याने वरोरा शहर स्वच्छ व सुंदर कसे होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.वरोरा नगरपालिका हद्दीत सहा प्रभाग असून २३ वॉर्ड आहेत. वरोरा शहराची लोकसंख्या ४६हजार ५३५ आहे तर कुटुंबाची संख्या १० हजार ३०२ आहे. वरोरा शहरात अनेक ठिकाणी नगर परिषदेने पुरुष व महिलांकरिता सार्वजनिक शौचालये तयार केली आहे. प्रत्येकाने शौचालयाचा वापर करावा, यासोबतच घरी शौचालय बांधून त्याचा उपयोग करण्याकरिता नगरपालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. शौचालय बांधण्याकरिता अनुदानही दिले जाते. परंतु यातील अनेक कुटुंब शौचालयाचे अनुदान घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले आहे. शौचालय बांधण्याकरिता नगरपालिका प्रशासनाने व्यापक पावले उचलली असताना आजही वरोरा शहरात १६१३ कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय नाही, असे आढळून आले आहे. ही बाब शहर सौंदर्याच्या दृष्टीने व आरोग्याच्या दृष्टीने गंभीर आहे. ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही, अशा कुटुंबियांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनुदान देवून शौचालय बांधण्याकरिता अर्ज मागितले. त्यात १४५० अर्ज आले. तपासणीअंती १०५० कुटुंब शौचालय बांधकामास पात्र ठरले. त्यामुळे अद्याप काही कुटुंबांनी शौचालय बांधकाम सुरु केले असले तरी १६३ कुटुंबियाकडे शौचालय राहणार नाही, एवढे मात्र निश्चित मानले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)