टोल वाचविण्यासाठी ऑपरेटरला चिरडले, विसापूर टोलनाक्यावरील थरार, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 07:56 IST2025-06-09T07:55:36+5:302025-06-09T07:56:47+5:30

Visapur Toll Plaza News: टोल वाचविण्यासाठी एका वाहनचालकाने चक्क ऑपरेटरला वाहनाखाली चिरडून फरार झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री १२:४० वाजतादरम्यान डब्ल्यूसीबीटी आर एल टोलनाका विसापूर येथे घडली.

Operator crushed to save toll, horror at Visapur toll plaza, video goes viral | टोल वाचविण्यासाठी ऑपरेटरला चिरडले, विसापूर टोलनाक्यावरील थरार, व्हिडीओ व्हायरल

टोल वाचविण्यासाठी ऑपरेटरला चिरडले, विसापूर टोलनाक्यावरील थरार, व्हिडीओ व्हायरल

विसापूर (जि. चंद्रपूर) - टोल वाचविण्यासाठी एका वाहनचालकाने चक्क ऑपरेटरला वाहनाखाली चिरडून फरार झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री १२:४० वाजतादरम्यान डब्ल्यूसीबीटी आर एल टोलनाका विसापूर येथे घडली. या घटनेत टूल ऑपरेटर संजय वांढरे (२८) रा. गांधी वॉड, बल्लारपूर हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघातानंतर चालक फरार झाला आहे. बल्लारपूरवरून चंद्रपूरकडे साहित्य घेऊन जाणारी टाटा एस क्र. एमएच ३४ बीजी ०६६९ वाहनाचा चालक टोलनाका वाचविण्याकरिता टोल फ्री लेनवरून जात होता. 

थांबविण्याचा प्रयत्न केला तर त्याने अंगावर वाहन घातले
कर्तव्यावर असलेले कर्मचारी संजय वांढरे याने ते वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता, टाटा एस चालकाने त्यांच्या अंगावर वाहन चढवले. संजय पळण्याचा प्रयत्न करत असताना चालक त्याच्या अंगावर वाहन नेत त्याला चिरडून पसार झाला. यात संजय वांढरे जखमी झाला असून त्याचे बरगडीचे हाड तुटले आहे.

Web Title: Operator crushed to save toll, horror at Visapur toll plaza, video goes viral