शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

उघड्या डीपी ठरत आहे धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:01 IST

महावितरणने शहरात काही भागांमध्ये वीजप्रवाहासाठी भुयारी केबल टाकले आहेत, तर बऱ्याच ठिकाणी वीज प्रवाहासाठी ट्रान्सफार्मरखाली डीपी उभारण्यात आल्या आहेत. या डीबीतून उच्च दाबाच्या वीज प्रवाहाचा संचार होतो. अनेक ठिकाणी या डीपीला समोरील भागात झाकण नसल्याचे चित्र आते तर काही ठिकाणी झाकण असतानाही ते लावण्याचे कष्ट कर्मचारी घेत नसल्याचे दिसते. आता पावसाळा सुरु झाला असताना डीबीला झाकण नसल्याने पावसाचे पाणी आतमध्ये शिरण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमहावितरणचे दुर्लक्ष : लोकवस्ती भागात अप्रिय घटनेला जबाबदार कोण ?

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने जिल्ह्यातील काही गावांमध्ये उभारलेल्या डीपीचे दार उघडे असल्याने ते धोकादायक ठरत आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, काही डीबी गावातील घराशेजारी, मैदानालगत आहे. याकडे मावितरण कपंनीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.महावितरणने शहरात काही भागांमध्ये वीजप्रवाहासाठी भुयारी केबल टाकले आहेत, तर बऱ्याच ठिकाणी वीज प्रवाहासाठी ट्रान्सफार्मरखाली डीपी उभारण्यात आल्या आहेत. या डीबीतून उच्च दाबाच्या वीज प्रवाहाचा संचार होतो. अनेक ठिकाणी या डीपीला समोरील भागात झाकण नसल्याचे चित्र आते तर काही ठिकाणी झाकण असतानाही ते लावण्याचे कष्ट कर्मचारी घेत नसल्याचे दिसते. आता पावसाळा सुरु झाला असताना डीबीला झाकण नसल्याने पावसाचे पाणी आतमध्ये शिरण्याची शक्यता आहे. अनेकवेळा गावातील लगान बालक डीपीजवळ खेळत असतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. वीज प्रवाहासाठी असलेल्या डीपीची डागडुजी, दुरुस्तीकरिता महावितरण कंपनीने पुढाकार घेऊन भविष्यातील धोका टाळावा, अशी मागणी केली जात आहे.दुरुस्तीसाठी टाळाटाळअनेकवेळा डीपीचे झाकण लावण्याचे कष्ट कर्मचारी घेत नाही. तर काही ठिकाणी डीपीचे झाकण तुटले अथवा नादुरुस्त असल्यास ते पुन्हा योग्य करण्याची जबाबदारी महावितरणची आहे. असे असताना शहर तथा ग्रामीण भागात ट्रान्सफॉर्मरच्या खाली उभारण्यात आलेल्या डीपी कधी सुरळीत होणार, जीवितहानी झाल्यानंतर महावितरण कंपनी कामाला लागणार का,असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे झाकण दुरुस्तीसाठी होत असलेली टाळाटाळ थांबावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.वीज देयकामुळे ग्राहक त्रस्तलॉकडाऊन काळातील तीन महिन्यांची वीज देयके ग्राहकांना पाठविले जात आहे. सदर देयक बघून अनेकांचे डोळे पांढरे होत आहे. गरीब, कष्टकरी, शेतमजूर, कामगार मार्च ते मे असे तीन महिने घरीच होते. आता कोरोनासह या नव्या वीज देयकांचा सामना करावा लागत आहे. तीन महिन्यांचे वीज देयके माफ करावेत, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :electricityवीज