शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
4
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
5
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
6
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
7
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
8
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
9
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
10
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
11
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
12
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
13
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
14
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
15
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
16
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
17
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
18
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
19
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
20
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचे नुसते खांब, वीज पुरवठा मात्र आंध्रातून

By admin | Updated: February 7, 2015 00:29 IST

महाराष्ट्र-आंध्र प्रदेश सीमेवरील वादग्रस्त चौदा गावांत अनेक समस्या आजही जैसे थे आहेत. एकमेकांकडे बोट दाखवणारे हे दोन्ही राज्य या गावांच्या विकासाची हमी अजूनही घेतलेली नाही.

संघरक्षित तावाडे  जिवतीमहाराष्ट्र-आंध्र प्रदेश सीमेवरील वादग्रस्त चौदा गावांत अनेक समस्या आजही जैसे थे आहेत. एकमेकांकडे बोट दाखवणारे हे दोन्ही राज्य या गावांच्या विकासाची हमी अजूनही घेतलेली नाही. काही सोयी महाराष्ट्र शासन तर काही सुविधा आंध्र शासन देत आहे. असे कुठपर्यंत चालणार असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.सीमेवरील चौदा गावांसाठी पूर्वीपासूनच आंध्राचे स्वस्त धान्य रेशन कार्ड होते. पण आंध्र प्रदेश मधून तेलंगाणा राज्य वेगळे झाल्यामुळे हे चौदा गाव तेलंगाणा राज्यात आले आहेत. त्यामुळे तेलंगाणा राज्याकडून या गावातील प्रत्येक कुटुंबाला नवीन रेशन कार्ड मिळाले आहेत. एक रुपया प्रति किलो तांदूळ, तेही एका व्यक्तीला सहा किलो एवढे स्वस्त धान्य या राज्याकडून मिळणार आहे.वीजेच्या बाबतीत महाराष्ट्राकडून अजूनही काही गावांत वीज पोहचलीच नाही. केवळ विजेचे खांबच गेल्या तीन वर्षापासून येथे उभे आहेत. भोलापठार, लेंडीगुडा, पद्मावती इंदिरानगर, येसापूर , अंतापूर, कामतगुडा, नारायनगुडा या गावात आंध्राची वीज प्रकाश देत असताना या प्रकाशात महाराष्ट्राचे खांब उभे राहून काय काम, असा प्रश्न नागरिक करत आहेत. गेल्या दोन महिन्यापासून तेलंगाना राज्यातून वीज पुरवठा बंद आहे. गावात अंधार आहे. पण याकडे ना तेलंगानाचे लक्ष ना महाराष्ट्र राज्याचे लक्ष आहे. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.