शहर काँग्रेसतर्फे ऑनलाईन घरगुती गणेश उत्सव स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:27 IST2021-09-11T04:27:52+5:302021-09-11T04:27:52+5:30
ही स्पर्धा निःशुल्क आहे. प्रथम बक्षीस ११ हजार १११, द्वितीय बक्षीस ७ हजार ७७७ रुपये, तृतीय ५ हजार ५५५, ...

शहर काँग्रेसतर्फे ऑनलाईन घरगुती गणेश उत्सव स्पर्धा
ही स्पर्धा निःशुल्क आहे. प्रथम बक्षीस ११ हजार १११, द्वितीय बक्षीस ७ हजार ७७७ रुपये, तृतीय ५ हजार ५५५, चतुर्थ ३ हजार ३३३, पाचवे बक्षीस २ हजार २२२ रुपये शिवाय प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत.
चंद्रपुरातील रस्ते, पाणी, आरोग्य, स्वच्छता, महागाई, बेरोजगारी, शेतकरी समस्यांवर आधारित देखावे तसेच पर्यावरणपूरक, कोरोना जनजागृती बाबतचे देखावे आदी विषयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. बाप्पांची मूर्ती ही प्लास्टर ऑफ पॅरिसची नसावी, स्पर्धक हा चंद्रपूर महानगर क्षेत्रातील असावा, अंतिम १५ स्पर्धकांच्या घरी परीक्षण समिती प्रत्यक्षात भेट देऊन पाहणी करणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सजावटीचे छायाचित्र व स्पर्धकांची माहिती ९९७०७९००३७ या व्हॉट्सॲपवर पाठविण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले आहे.