साजिद शकील शेख (२३, रा. चंडिका वॉर्ड) असे आरोपीचे नाव असून त्याच्या घरी सुगंधित तंबाखूचा साठा असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली. त्याआधारे घराची झडती घेतली असता त्याच्या घरी ३७० डब्बे सुगंधित तंबाखू आढळून आला. एक लाख ५० हजार रुपये त्याची किंमत आहे. विशेष म्हणजे संचारबंदीच्या काळात इतर व्यावसायिकांची दुकान बंद असली तरी सुगंधित तंबाखू विक्रीचे प्रमाण शहरात गल्लोगल्ली सुरू आहे. मात्र या प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे लक्ष नाही. यावर अंकुश आणण्यासाठी भद्रावती पोलिसांनी विशेष मोहीम उभारली आहे. ही कारवाई ठाणेदार सुनीलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागप्रमुख अमोल तुळजेवार, केशव चिटगिरे, निकेश ढेंगे, हेमराज प्रधान, शशांक बदमवार यांनी केली.
===Photopath===
030621\img-20210603-wa0070.jpg
===Caption===
एक लाख पन्नास हजाराचा सुगंधित तंबाखू जप्त