शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

तेलाची फोडणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:25 IST

कोरोनामुळे तीन ते चार महिने कंपन्या बंद होत्या. त्यानंतर सोशल डिस्टन्सिंगमुळे काही प्रमाणात काम सुरू झाले. मात्र पाहिजे त्या ...

कोरोनामुळे तीन ते चार महिने कंपन्या बंद होत्या. त्यानंतर सोशल डिस्टन्सिंगमुळे काही प्रमाणात काम सुरू झाले. मात्र पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन घेता आले नाही. त्यामुळे काही प्रमाणात तेलाची टंचाई भासत होती. तसेच यंदा परतीच्या पावसाने सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा आदी पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे तेलाच्या दरामध्ये दररोज वाढ होत आहे. मागील महिन्यांच्या तुलनेत या महिन्यात तेलाच्या किमतीत चक्क ३० ते ४० रुपयांची वाढ झाली आहे. मागील महिन्यात शेंगदाणा तेल १४० रुपये प्रति किलो विकले जायचे; मात्र आता १६० रुपये, सूर्यफूल १२५ वरून १४०, तर पामतेलामध्येही १० रुपयांची वाढ झाली आहे. कोरोनामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना आता जीवनावश्यक असणाऱ्या तेलाच्या किमतीत वाढ होत असल्याने सर्वसामान्यांना बजेट बसविताना मोठी कसरत करावी लागत आहे.

बॉक्स

सोयाबीनला फटका

यंदा अवकाळी तसेच परतीच्या पावसाने सोयाबीनला मोठा फटका बसला आहे. नवे पीक अद्यापही बाजारपेठेत पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध झाले नाही. त्या तुलनेत मागणी वाढत आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या तेलाचे भाव गगणाला भिडले आहेत.

कोट

कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्य अडचणीत आहेत. अनेकांच्या हाताला काम नाही. घर चालवणे कठीण झाले आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. अनेकांचे रोजगार हिरावले असताना, महागाईने तोंड वर काढले आहे. तेलाच्या किमतीत २० ते ३० रुपे प्रति किलो वाढ झाली असल्याने गरिबांना जगणे कठीण झाले आहे.

- मोनिका वाकोडे, गृहिणी, चंद्रपूर

कोट

पंधरवड्यापूर्वी तेलाचे भाव वाढले होते. मात्र मागील आठवडाभरात तेलाचे दर स्थिर आहेत. तेलाच्या दरामध्ये चढ-उतार होत असते.

इस्माईल ढाकवाला, बल्लारपूर

- राकेश ठाकरे, व्यापारी, मूल