शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

आता मी जाऊ कुठे...

By admin | Updated: December 21, 2015 00:58 IST

पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये अनेक दाम्पत्य वंशाचा दिवा म्हणून मुलगा जन्मास यावा, अशी आस करतात. उतरत्या वयात मुलगा आपली आधाराची काठी व्हावी, अशी अपेक्षा करतात.

मन हेलावून टाकणारी घटना : ८० वर्षीय वृद्ध मातेची आर्त हाकराजकुमार चुनारकर खडसंगीपुरुषप्रधान संस्कृतीमध्ये अनेक दाम्पत्य वंशाचा दिवा म्हणून मुलगा जन्मास यावा, अशी आस करतात. उतरत्या वयात मुलगा आपली आधाराची काठी व्हावी, अशी अपेक्षा करतात. मात्र एका निष्ठुर मुलाने आपल्या ८० वर्षीय वृद्ध मातेला घराबाहेर काढल्याचा संतापजनक प्रकार चिमूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वाघेडा गावात घडला. त्यामुळे या मातेने थेट पोलीस ठाणे गाठून आपली कर्मकहानी कथन करीत, ‘आता या वयात मी जावू कुठे’ अशी आर्त हाक जनाबाई रामाजी शास्त्रकार या ८० वर्षीय मातेने पोलिसांसह समाजाला दिली आहे.चिमूरपासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघेडा गावात रामाजी व जनाबाई शास्त्रकार यांचा परिवार राहत होता. त्यांच्या उदरातून दोन मुली व एक मुलगा असे अपत्य झाले. रामाजी व जनाबाईचा संसाराचा गाडा दोन एकर शेतीवर चालायचा. दरम्यान, जनाबाईच्या दोन मुलींचा विवाह झाल्याने त्या बाहेरगावी राहतात. जनाबाईचा पती १०-१२ वर्षांअगोदर जनाबाईला सोडून गेल्याने जनाबाईचा आधारच हरवला. मात्र काही दिवस एकुलता एक मुलगा आहे म्हणून त्या आशेवर जीवन जगत असताना आपला मुलगा आज उद्या साथ देईल, अशी आशा होती. मात्र मुलगा व सून या दोघांनी वृद्ध आईला आधार देण्याऐवजी घरातून हुसकावून लावले. त्यामुळे ती वृद्धा बाजुला झोपडीत जीवन व्यथित करीत आहे. असे जीवनचक्र सुरू असतानाच दुसऱ्याच्या शेतीवर कामासाठी जात असतानाच ज्याला नऊ महिने उदरात वाढविले त्यानेच जन्मदात्या मातेच्या झोपडीला कुलूप लावून हाकलून दिले. त्यामुळे जनाबाईवर या वयात मोठे संकट कोसळले आहे. आता काय करावे, कुठे जावे, या प्रश्नाने अस्वस्थ झालेल्या त्या वृद्ध मातेने चिमूर पोलीस ठाणे गाठून आपली करूण कहाणी कथन केली. ८० वर्षीय वृद्ध मातेला आधार देण्याची वेळ असताना तिची सेवा तर दूर तिला घराबाहेर काढण्याचा संतापजनक प्रकार करणारा तिचा निर्दयी मुलगा सुधाकर रामजी शास्त्रकार (४०) व पत्नी उषा सुधाकर शास्त्रकार (३४) यांच्याविरूद्ध ज्येष्ठ नागरिक अधिनियम २००७ नुसार पालकाचे कल्याण हित व पोषण कायद्यांतर्गत कलम २४, २५ नुसार भादंवि ३२३ (३४) गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने चिमूर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ८० वर्षी वृद्ध मातेची हाक समाजातील सामाजिक संघटनांच्या कानापर्यंत पोहोचेल का, अशा निराधार मातांना आधार देतील काय, असा प्रश्न या घटनेने उपस्थित झाला आहे. समाजामध्ये वंशाचा दिवा म्हणून मुलाकडे पाहिल्या जाते आणि परिवारात मुलगा झाला तर मुलाचे स्वागत मोठ्या आनंदाने करण्यात येते. त्याला नऊ महिने उदरात वाढवण्यापासून त्याच्या पालनपोषणासाठी आईवडील अनेक दु:ख सहन करतात. मात्र मुलगा कर्ता झाला की त्याला आईवडिलांचा विसर पडत जातो. जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडून दिल्या जाते. त्यामुळे वृद्ध आईवडिलांना नाईलाजास्तव वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागतो. अशा वृद्ध आईवडिलांना आधार मिळावा म्हणून शासन अनेक योजना राबवित आहे. असे असतानाही अशा घटनावर आळा बसावा म्हणून शासनाने ज्येष्ठ नागरिक अधिनियम २००७ कायदा अंमलात आणला. तरीही समाजात अशा घटना घडत आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून या वृद्ध मातेच्या पालन पोषणासाठी, पुनर्वसनासाठी समाज कल्याण अधिकारी तथा निराधार योजनेसाठी पोलीस विभागामार्फत पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. तिला निवारा मिळवून देण्यासाठी योग्य कारवाई करण्यात येईल.- संतोष ताले, ठाणेदार, चिमूर.