शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

आता कॉन्टेक्ट ट्रेसींगवर भर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:16 IST

चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरोना रूग्‍णांची वाढती संख्‍या तसेच वाढते मृत्‍यू लक्षात घेता प्रशासनाने या आपत्‍तीचा दक्षपणे सामना करायचा असेल ...

चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरोना रूग्‍णांची वाढती संख्‍या तसेच वाढते मृत्‍यू लक्षात घेता प्रशासनाने या आपत्‍तीचा दक्षपणे सामना करायचा असेल तर जिल्‍हाधिकारी, मेडीकल कॉलेजचे अधिष्‍ठाता, जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक आणि जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी या चार अधिकाऱ्यांमध्‍ये असलेल्‍या समन्‍वयाचा अभाव तातडीने दूर व्‍हावा, जिल्ह्यातील चाचण्‍यांची संख्‍या वाढवावी, निर्णयांच्‍या अंमलबजावणीची गती वाढवावी, अशा सुचना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केल्‍या. दरम्यान, या सुचनांच्‍या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करावी व जिल्ह्यातील टेस्‍टींगची संख्‍या वाढवत कॉन्‍टेक्‍ट ट्रेसींगवर भर द्यावा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्‍य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्‍हाधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्‍या आटोक्‍यात आणण्‍याच्‍या दृष्‍टीने आरोग्‍य यंत्रणेचा आढावा घेण्‍यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्‍या विनंतीनुसार सार्वजनिक आरोग्‍य मंत्री राजेश टोपे यांनी ऑनलाईन बैठक घेतली. बैठकीला आ. सुधीर मुनगंटीवार, आ. सुभाष धोटे, आ. किशोर जोरगेवार, जि. प. अध्‍यक्षा संध्‍या गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने, अधिष्‍ठाता डॉ. हूमणे, जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक डॉ. राठोड, जिल्‍हा आरोग्‍य अधीक्षक डॉ. गहलोत, मनपा आयुक्‍त राजेश मोहीते आदींची उपस्थिती होती.

चंद्रपूर जिल्‍हयात कोरानाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ऑस्‍कीजन बेड्स जास्‍तीत जास्‍त संख्‍येने निर्माण करावे, खासगी डॉक्‍टरांच्‍या सेवा घ्‍याव्या, रूग्‍णांना पोस्‍टीक जेवण द्यावे, आरोग्‍य सेवेचा दर्जा सुधारावा, कॉन्‍टेक्‍ट ट्रेसींग वाढवावे असे विविध निर्देश आरोग्‍यमंत्र्यांनी जिल्‍हाधिका-यांना दिले. लसीकरणात चंद्रपूर जिल्‍हा अव्‍वल ठरावा अशी अपेक्षा ना. राजेश टोपे यांनी व्‍यक्‍त केली.

बॉक्स

कोरोना चाचण्या वाढवाव्या-सुधीर मुनगंटीवार

बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वाढती रूग्‍णसंख्‍या लक्षात घेता कोरोना चाचण्या आणखी वाढविण्‍याची मागणी केली. वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ, नर्सेस यांची रिक्‍त पदे त्वरीत भरावी, अशा सूचना केल्या. कोरोना काळातील देयके प्रलंबित आहेत. अशी परिस्‍थीती राहिली तर प्रशासनाला कोण मदत करेल, असा सवालही त्‍यांनी केला. बेड मॉनिटरींग सिस्‍टीम उत्‍तम करावी, कॉल सेंटर निर्माण करावे, कंत्राटी कामगारांच्या आठ महिन्‍यांपासून थकित वेतनाकडेही त्यांनी लक्ष वेधले.