शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

आता शिधापत्रिकेसोबत आधार लिंक आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:29 AM

वढोली : केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शिधापत्रिकेसोबत मोबाइल व आधार लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे. वितरण प्रणालीसाठी ...

वढोली : केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शिधापत्रिकेसोबत मोबाइल व आधार लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे. वितरण प्रणालीसाठी हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येकाने शिधापत्रिकेसोबत आधार कार्डची नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यभर शिधापत्रिकेसोबत आधार कार्ड नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. यासाठी आधार कार्डची अद्यापही नोंदणी न केलेल्या लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकाननिहाय यादी तयार करून त्यांच्या मार्फतीने ई-पास उपकरणातील ई-केवायसी व मोबाइल क्रमांक जोडण्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. याकरिता प्रशासनाच्या वतीने गोंडपिपरी तालुक्यात तहसीलदार के. डी. मेश्राम यांच्या मार्गदर्शनात जागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

तालुका प्रशासन व रास्तभाव धान्य दुकानामार्फत वारंवार सूचना देऊनही अनेकांनी शिधापत्रिकेसोबत अद्याप आधार कार्ड नोंदणी केलेली नाही. मात्र ३१ जानेवारी २०२१ पर्यंत नोंदणी न केल्यास लाभार्थ्यांना आधार कार्डची नोंदणी होईपर्यंत अन्नधान्यापासून वंचित राहावे लागणार असल्याची माहिती तहसीलदार के. डी. मेश्राम यांनी दिली.