शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

वनदाव्याबाबत नोटीस : वनमंत्र्यांनी पट्टेवाटपाचा दावा पूर्ण करावा

By admin | Updated: January 6, 2017 01:11 IST

अनुसूचित जमाती व इतर वननिवासी वनहक्क मान्य करण्यासाठी अतिक्रमणधारकांना उपविभागीय

कोठारी : अनुसूचित जमाती व इतर वननिवासी वनहक्क मान्य करण्यासाठी अतिक्रमणधारकांना उपविभागीय अधिकाऱ्यांकडून त्रुट्यांची पूर्तता करण्यासाठी नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. नोटीस प्राप्त होताच अतिक्रमणधारकांची तारांबळ उडाली आहे. यात वारंवार त्रुटींची पूर्तता करण्याची मागणी करण्यात आल्याने अतिक्रमणधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी वनहक्क मान्य करण्यासाठी अधिनियम २००६चा नियम २००८ व सुधारणा नियम २०१२ मधील तरतुदीनुसार आपला दावा ग्रामसभेमार्फत प्राप्त झालेला असून या प्रकरणात त्रुटी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामध्ये १ ते १४ त्रुटींची पूर्तता करण्यासाठी नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्यात तीन पिढ्यांचा पुरावा मागविण्यात आला आहे. नोटीस प्राप्त होताच अतिक्रमणधारकांनी त्रुटींच्या पूर्ततेसाठी धावपळ सुरू केली आहे. त्यात त्यांचे नाहक आर्थिक नुकसान होत आहे. त्रुटीबाबत वारंवार मागणी करून अतिक्रमणधारकांना शासनस्तरावरून त्रस्त करण्यात येत आहे. १९७२ पासून किंवा त्यापूर्वीपासून आदिवासी आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी झुडपी जंगलात वास्तव्य करून शेती करीत आहेत. त्याची नोंद शासनस्तरावर करण्यात आली आहे. अतिक्रमण धारकांना कसत असलेल्या जमीनीचे पक्के पट्टे मिळावे, त्यांचा हक्क प्राप्त व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन, निवेदने देण्यात आली. सध्या राज्याचे वनमंत्री असलेले व यापूर्वी विधानसभेचे नेतृत्व करणारे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अतिक्रमणधारकांना हक्क मिळाला पाहिजे, यासाठी वेळोवेळी पुढाकार घेतला होता. मात्र या प्रकरणात आजपर्यंत केवळ आश्वासन मिळले आहे. (वार्ताहर) जिल्ह्यात अतिक्रमणधारकांची संख्या मोठी असून त्यातील नाममात्र आदिवासींना पट्टे वितरित करण्यात आले आहेत. मात्र अनेकजण त्यापासून वंचित आहेत. हे आदिवासी पट्टयाच्या प्रतीक्षेत आहेत. शासनस्तरावरून वेळोवेळी त्रुटींची पूर्तता करण्याची मागणी करून अतिक्रमणधारकांना वेठीस धरण्यात येत आहे. तीन पिढ्यांचा पुराव्याची अट रद्द करून त्वरित पट्टे वितरीत करावेत. - अनिल वनकर, सामाजिक कार्यकर्ता, कोठारी