शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगचा पत्ता नाही, हातगाड्यांचे अतिक्रमण

By admin | Updated: December 23, 2014 23:01 IST

भौगोलिकदृष्ट्या कमी क्षेत्रफळ असलेल्या पण दाट लोकवस्तीच्या गडचांदूर शहरात हातगाड्यांचे रस्ते व पार्किंग झोनचा कुठेच पत्ता नाही. त्यामुळे वाटेल त्या ठिकाणी हातगाड्या व वाहनांची पार्किंग केली जाते.

आशिष देरकर - गडचांदूरभौगोलिकदृष्ट्या कमी क्षेत्रफळ असलेल्या पण दाट लोकवस्तीच्या गडचांदूर शहरात हातगाड्यांचे रस्ते व पार्किंग झोनचा कुठेच पत्ता नाही. त्यामुळे वाटेल त्या ठिकाणी हातगाड्या व वाहनांची पार्किंग केली जाते. अरुंद रस्ते आणि अतिक्रमणामुळे संपूर्ण रस्ते व्यापलेले आहेत. त्यामुळे दररोज नागरिकांना व प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. गडचांदूर शहराची रचना मुळात चुकीच्या पद्धतीने झाल्याने शहरात दोन मुख्य रस्ते आहेत. या दोन्ही मुख्य रस्त्यांच्या दोन्ही कडेला व्यापारी बाजारपेठ आहेत. केवळ १५ फुटाचे दोन्ही रस्ते असल्यामुळे ग्राहकांना स्वत:चे वाहन उभे करण्याकरीता जागा उपलब्ध राहत नाही. अशावेळी ग्राहक रस्त्यावर वाहन पार्किंग करतात. येथेच हातगाड्याही उभ्या केल्या जातात. त्याचा त्रास वर्दळ करणाऱ्या वाहनधारकांना होतो. या मुख्य रस्त्यावर विरुद्ध दिशेने एकाचवेळी दुसरे चारचाकी वाहन आल्यास अनेकदा वाहतूक ठप्प होते. अशावेळी दुचाकी चालक कित्येकदा हॉर्न वाजवून मिळेल त्या गल्लीतून निघून जातात.गडचांदूर सिमेंंट सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गडचांदूर शहराच्या सभोवताल अल्ट्राटेक, माणिकगड, मुरली अ‍ॅग्रो व अंबुजा असे चार सिमेंंट कारखाने आहेत. गडचांदूरचे महत्त्व वाढविण्यात कारखान्यांचा मोठा वाटा आहे. विविध प्रांतातील लोक येथे रोजगारासाठी वास्तव्यास असल्यामुळे शहराची लोकसंख्या वाढली आहे. पण दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे येथील समस्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.सिमेंटची वाहतूक करण्याकरीता गडचांदूर शहरात अनेक ट्रान्सपोर्ट कंपन्या आहेत. कोणत्याही ट्रान्सपोर्टवाल्यांनी आपले ट्रक उभे करण्यासाठी पार्किंगची व्यवस्था केलेली नाही. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रिघ लागलेली असते. ज्या रस्त्यावर हे वाहन उभे असतात, तो सुद्धा गडचांदूर शहरात प्रवेश करण्याच्या मुख्य मार्ग आहे. रस्त्यावरील वाहनांनामुळे अनेकदा अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला. मात्र अवैध पार्किंगवर आळा घालण्यात पोलिसांना यश आलेले नाही. अवैध पार्किंगवर कारवाई करण्याची पोलिसांमध्ये इच्छाशक्ती नसल्यामुळे ट्रान्सपोर्टवाल्यांची दादागिरी नागरिकांच्या जीवावर बेतत आहे.माणिकगड कंपनीच्या प्रवेशद्वारापासून ते लखमापूर फाट्यापर्यंत जिथं तिथं वाहनं उभी राहतात. याच मार्गावरुन शाळेचे विद्यार्थी, दुचाकी चालक, कंपनीचे मजूर वर्दळ करीत असतात. या ट्रकांमुळे या ठिकाणी अनेक अपघात पण घडले आहेत. पण ते रोखण्यासाठी आजपर्यंत कोणीच पाऊले उचललेली नाहीत. नगरपरिषद व पोलिसांनी समन्वय साधून नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी स्विकारुन अवैध पार्किंग व अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. यासाठी अधिकाऱ्यांचे उदासीन धोरण दूर होण्याची गरज आता निर्माण झाली आहे.