शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्येची नऊ प्रकरणे मंजूर

By admin | Updated: March 2, 2015 01:07 IST

शेतकरी आत्महत्या करण्याचे कारण शोधत त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी याकरिता जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे.

वरोरा: शेतकरी आत्महत्या करण्याचे कारण शोधत त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी याकरिता जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीची नुकतीच बैठक झाली. यामध्ये शेतकरी आत्महत्येचे १० प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील नऊ प्रकरणे पात्र ठरली तर एक प्रकरण अपात्र ठरवण्यात आले. गत दोन वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात वरोरा तालुक्यातील अभिमन कानुजी काळे बोरगाव (दे.), दशरथ नथ्यू नागरकर निमसडा, संतोष नारायण नक्षीणे पिजदुरा, ब्रह्मपुरी तालुक्यातील शंकर श्रीराम शेंडे चोरगाव, बालाजी शिवराम वनकर ब्रह्मपुरी, मुर्लीधर ऋषी चिमूरकर हळदा, सुनील बक्षिजी ठोरे, राजेंद्र निवृत्त गायकवाड जिवती, महादेव दशरथ नन्नावरे तळोधी ता. चिमूर, सुभाष वासुदेव भोगेकर धानापूर ता. गोंडपिपरी अशा १० शेतकऱ्यांची प्रकरणे समिती समोर ठेवण्यात आली. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांवर बँकाचे व खाजगी रित्या मोठ्या प्रमाणात कर्ज होते. सततची नापिकी यामुळे त्यांनी आपले जिवन संपविल्याचे मानले जात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडू नये, याकरिता शासनाच्या वतीने एक लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येते. परंतु, त्यांच्याकडील कर्ज हप्त्याने भरावे लागणार आहे. ब्रह्मपुरी येथील बालाजी बनकर या शेतकऱ्यांचे प्रकरण अपात्र ठरले आले असून पात्र ठरलेल्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने मदत केली जाणार आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्ती ठार झाल्यास आठ लाख रुपये दिले जाते. सततची नापिकी व कर्जाचा डोंगर यामुळे शेतकरी आत्महत्या होत असून आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांना मिळणारी मदत अत्यल्प आहे. यामध्ये वाढ करण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)