शौचाचे कारण सांगून ‘ती’ घरातून बाहेर पडली आणि परतलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 03:24 PM2020-06-22T15:24:06+5:302020-06-22T15:35:01+5:30

भंगाराम तळोधी येथील रूचिता चिट्टावार हिचा विवाह १९ मार्च रोजी झाला होता. चार दिवसापुर्वी रूचिता भंगाराम तळोधी येथे आली होती. रविवारी सायंकाळच्या सुमारास ती लोटा घेऊन बाहेर पडली. पण बराच वेळपर्यत घरी परतली नाही.

newly married girl's dead body found in well in Chandrapur district | शौचाचे कारण सांगून ‘ती’ घरातून बाहेर पडली आणि परतलीच नाही

शौचाचे कारण सांगून ‘ती’ घरातून बाहेर पडली आणि परतलीच नाही

Next
ठळक मुद्देमृतक तीन महिन्याची गर्भवतीमृत्यूचे कारण गुलदस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील गावालगत असलेल्या विहिरीत एका एकोणवीस वर्षीय नवविवाहितेचा मृतदेह आढळून आला. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना समोर आली. ही महिला तीन महिन्याची गर्भवती होती. या घटनेमूळे परिसरात खळबळ उडाली आहे. भंगाराम तळोधी येथील रूचिता चिट्टावार हिचा विवाह १९ मार्च रोजी झाला होता. ती आपल्या पतीसह चंद्रपूरला वास्तव्यास होती. दरम्यान चार दिवसापुर्वी रूचिता भंगाराम तळोधी येथे आली होती. रविवारी सायंकाळच्या सुमारास ती लोटा घेऊन बाहेर पडली. पण बराच वेळपर्यत घरी परतली नाही.

नातेवाईकांनी शोधाशोध सूरू केली. दरम्यान गावालगत असलेल्या विहीरीजवळ लोटा व चप्पल आढळून आली. यामूळे शंकेची पाल चुकचुकली. गोंडपिपरी पोलीसांना घटनेची माहिती देण्यात आली. यावेळी शोधाशोध केली असता विहिरीमध्ये रूचिताचा मृतदेह आढळून आला. यामुळे कुटुंबियांना प्रचंड धक्का बसला. लॉकडाऊनच्या अगदी पूर्वीच तिचा विवाह झाला होता. ती तीन महिन्याची गर्भवती असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. रूचीताचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने विविध शंका उपस्थित होत आहेत. ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात पिएसआय पटले हे घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

शवविच्छेदनास विलंब
रूचिताचा मृतदेह आढळल्यानंतर पोलीसांनी पंचनामा केला. यानंतर तिचे शव गोंडपिपरीच्या ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. पण यावेळी वैदकीय अधिक्षक उपस्थित नव्हते. ती तीन महिन्याची गर्भवती असल्याने दुसऱ्या डॉक्टरांनी आपणाकडून शवविच्छेदन शक्य नसल्याचे सांगितले. यामूळे काल रात्री तिचे शव चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आले.

 

Web Title: newly married girl's dead body found in well in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू