जिवती नगरपंचायतीवर राष्ट्रवादी-काँग्रेसची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 18:46 IST2022-02-17T18:46:12+5:302022-02-17T18:46:43+5:30

गुरुवारी पार पडलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राकॉंच्या कविता गजानन आडे तर उपाध्यक्ष पदासाठी कॉंग्रेसचे डॉ. अंकुश अर्जुनराव गोतावळे यांची वर्णी लागली.

NCP-Congress wins over Jivti Nagar Panchayat | जिवती नगरपंचायतीवर राष्ट्रवादी-काँग्रेसची सत्ता

जिवती नगरपंचायतीवर राष्ट्रवादी-काँग्रेसची सत्ता

चंद्रपूर : १७ नगरसेवक असलेल्या जिवती नगरपंचायतमध्ये काँग्रेस सहा, राष्ट्रवादी काँग्रेस सहा व गोंडवाना गणतंत्र पार्टीचे पाच नगरसेवक निवडून आले. गुरुवारी पार पडलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राकॉंच्या कविता गजानन आडे तर उपाध्यक्ष पदासाठी कॉंग्रेसचे डॉ. अंकुश अर्जुनराव गोतावळे यांची वर्णी लागली.

गुरूवारी झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी राकॉंच्या कविता गजानन आडे (राष्ट्रवादी) यांचे नाव अमर अर्जुन राठोड (राष्ट्रवादी) यांनी नाव सुचविले तर गोंगपाच्या लक्ष्मीबाई भीमराव जुमनाके यांचे नाव ममता नंदूजी जाधव (गोंगपा) यांनी सुचविले. कविता गजानन आडे यांना १२ मते तर लक्ष्मीबाई भीमराव जुमनाके यांना ५ मते मिळाली. यात कविता आडे विजयी झाल्या.

उपनगराध्यक्ष पदासाठी डॉ. अंकुश अर्जुनराव गोतावळे (काँग्रेस) यांचे शामराव लच्चू गेडाम (काँग्रेस) यांनी नाव सुचविले तर जमालुद्दीन अहमद शेख (गोंगपा) यांचे नाव कृष्णा लक्ष्मण सिडाम (गोंगपा) यांनी सुचविले. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डॉ. अंकुश अर्जुनराव गोतावळे (काँग्रेस) यांना १२ तर जमालुद्दीन अहमद शेख (गोंगपा) यांना ५ मते मिळाली.

याप्रसंगी पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे व मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर उपस्थित होते.

Web Title: NCP-Congress wins over Jivti Nagar Panchayat