शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाचे चंद्रपुरात पडसाद

By admin | Updated: December 20, 2015 00:44 IST

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाचे तीव्र पडसाद चंद्रपुरात उमटले. काँग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक गांधी चौकातील...

भाजपाचा धिक्कार : सूडबुध्दी उगवत असल्याचा पुगलिया यांचा आरोपचंद्रपूर : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाचे तीव्र पडसाद चंद्रपुरात उमटले. काँग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ व इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यासमोर केंद्रातील भाजपा सरकारचा धिक्कार करून शनिवारला जाहीर निषेध करण्यात आला.अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह इतर नेत्यांवर नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून न्यायालयीन प्रक्रियेत विनाकारण गोवण्यात आले. भाजपा सरकारने यासाठी डॉ. सुब्रमण्यम स्वामी या जनाधार नसलेल्या नेत्याला पुढे केले. सदर प्रकार काँग्रेसला बदनाम करणारा आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर आकसापोटी सुडबुध्दीचा आहे. भाजपाचा कुटील डाव काँग्रेस पक्ष हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशारा जेष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी दिला.भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी व दिल्ली येथील पटियाला न्यायालयाने सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी न्यायालयात हजर राहून मान राखला. न्यायदानात त्यांच्यासह इतर नेत्यांना विनाअट जामीन मंजुर झाला. याचे पडसाद येथे उमटले. भाजपाचा धिक्कार व सोनिया गांधी तथा राहुल गांधी यांचा जयजयकार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी केला.येथील गांधी चौक येथे काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया व युवा नेते राहुल पुगलिया यांच्या नेतृत्वात भाजपाचा निषेध करण्यात आला. यावेळी बल्लारपूरच्या नगराध्यक्ष छाया मडावी, गजानन गावंडे, घनश्याम मुलचंदानी, अशोक नागापुरे, प्रवीण पडवेकर, संजय महाडोळे, प्रशांत दानव, चंद्रशेखर पोडे, देवेंद्र बेले, सकीना अंसारी, राजेश रेवलीवार, श्रीनिवास पारनंदी, देवेंद्र आर्य, भास्कर माकोडे, कविता खरतड, जि.प. सदस्य रामभाऊ टोंगे, अनेकश्वर मेश्राम, वसंत मांढरे, रामदास वाग्दरकर, गजानन दिवसे, बाळू चांदेकर, स्वप्नील तिवारी, चेतन गेडाम, मोंटू मानकर तर इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलनाचे नेतृत्व नंदू नागरकर यांनी केले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, अ‍ॅड. विजय मोगरे, देवराव भांडेकर, सुनिता लोढीया, अश्विनी खोब्रागडे, डॉ. आसावरी देवतळे, प्रमोद राखुंडे, डॉ. विजय देवतळे, महेश मेंढे, प्रकाश देवतळे, केशव रामटेके, अ‍ॅड. भास्कर दिवसे, संजय रत्नपारखी आदींचा सहभाग होता. (स्थानिक प्रतिनिधी)