शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

मूलमधील मटन मार्केट सीओंनी हटविले

By admin | Updated: February 27, 2015 00:54 IST

नगर परिषद मूल अंतर्गत येणाऱ्या इंदिरानगर वॉर्डातील मटन व चिकन मार्केटचा येथील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

लोकमतचा प्रभावमूल : नगर परिषद मूल अंतर्गत येणाऱ्या इंदिरानगर वॉर्डातील मटन व चिकन मार्केटचा येथील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मटन मार्केटच्या दुर्गंधीमुळे नागरिक विविध आजारानी त्रस्त होते. याबात ‘लोकमत’ वृत्त प्रकाशित करताच नव्याने आलेले मुख्याधिकारी रविंद्र ढाके यांनी याकडे लक्ष देऊन मटन व चिकन मार्केट हटवून विक्रेत्यांना इतरत्र बसण्याची सुविधा करून दिली आहे. त्यामुळे वॉर्डातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.येथील त्रस्त नागरिकांनी मटन मार्केट समस्येबाबत नगरपरिषद प्रशासनाच्या वेळोवेळी निर्देशनास आणून दिले. मात्र याकडे दुर्लक्ष केल्या जात होते. आठवड बाजार ज्या ठिकाणी भरतो, त्याच परिसराच्या कडेला मटन व चिकन मार्केट थाटण्यात आले होते. बकऱ्याची व कोंबड्याची कत्तल केल्यानंतर अनावश्यक मांस त्याच ठिकाणी टाकले जात होते. त्यामुळे दुर्गंधी पसरत होती. त्यामुळे वॉर्डातील लिना बद्देलवार व मिलींद खोब्रागडे यांनी ही बाब वेळोवेळी न.प. प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. याच परिसरात डुकरांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने स्वाईन फ्लूची धास्ती देखील नागरिकांत बळावली होती. १७ फेब्रुवारीला ‘लोकमत’ ने ‘महाविशरात्रीच्या पर्वावर स्वाईन फ्लूची धास्ती’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. त्यामुळे न.प. प्रशासन खळबळून जागे झाले आणि सात दिवसानंतर मटन-चिकन मार्केट हटविण्याची कारवाई मुख्याधिकारी रविंद्र ढाके यांनी रितसर नोटीस बजावून केली. मुख्याधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने चिकन व मटन मार्केट मधील दुकानदारांनी आपले दुकान कत्तलखाना परिसरात लावले आहेत. आठवडी बाजाराला जागा कमी पडत असल्यास काही वर्षांपूर्वी अर्धवट गाळे बांधले आहेत, त्यांना पाडून त्या ठिकाणी बाजारासाठी ओठे निर्माण करण्यात यावे, अशी मागणी बाजार विक्रेत्यांनी केली आहे. आठवडी बाजार परिसरात पालिकेने संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे आठवडी बाजाराचा परिसर सुव्यवस्थित व येणाऱ्यांना सोयीचे होईल, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. (तालुका प्रतिनिधी)