शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी जनगणनेचा ठराव महानगरपालिकेने आमसभेत मांडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 06:00 IST

सन १८७१ ते १९३१ या ६० वर्षांत इंग्रज राजवटीत नियमित दर दहा वर्षांनी ओबीसीची जनगणना झाली आहे. १९३१ च्या शेवटच्या ओबीसी जनगणनेनुसार ओबीसीची संख्या ही ५२ टक्के आहे. २०२१ ची राष्ट्रीय जनगणना होऊ घातलेली आहे. या जनगणनेमध्ये ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणनेचा रकाना नसल्यामुळे अनेकदा ओबीसी समाजासाठी शासनाच्या मिळणाऱ्या योजनांचा व सरकारी धोरणांचा ओबीसी समाजाला लाभ मिळत नाही अथवा मिळणार नाही.

ठळक मुद्देनगरसेवकांचे महापौरांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आगामी २०२१ च्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव मनपा आमसभेत घ्यावा व त्या ठरावाद्वारे केंद्राकडे शिफारस करावी, ठरावाची एक प्रति रजिस्टर जनरललादेखील द्यावी, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक सचिन भोयर यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यानिशी महापौरांकडे दिले आहे.सन १८७१ ते १९३१ या ६० वर्षांत इंग्रज राजवटीत नियमित दर दहा वर्षांनी ओबीसीची जनगणना झाली आहे. १९३१ च्या शेवटच्या ओबीसी जनगणनेनुसार ओबीसीची संख्या ही ५२ टक्के आहे. २०२१ ची राष्ट्रीय जनगणना होऊ घातलेली आहे. या जनगणनेमध्ये ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणनेचा रकाना नसल्यामुळे अनेकदा ओबीसी समाजासाठी शासनाच्या मिळणाऱ्या योजनांचा व सरकारी धोरणांचा ओबीसी समाजाला लाभ मिळत नाही अथवा मिळणार नाही. ओबीसी लाभार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे. अजूनही शासन ओबीसी १९३१ च्या आकडेवारीचा आधार घेत आहे.केंद्र सरकारला खरच ओबीसी समाजाला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास करायचा असेल तसेच ओबीसी समाजाला त्यांचे संवेधानिक अधिकार द्यायचे असेल तर सरकारकडे ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणनेचा आकडा असणे गरजेचे आहे. त्याशिवाय ओबीसी समाजाचा विकास करता येणार नाही. सुप्रिम कोर्टानेदेखील वारंवार केंद्र सरकारकडे निश्चित ओबीसीची आकडेवारी मागितली आहे.२०२१ मधील राष्ट्रीय जनगणना करतेवेळी नागरिकांच्या मागास प्रवर्गातील ओबीसी लोकसंख्येची जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव चंद्रपूर महानगरपािलकेच्या आमसभेत मंजूर करून तो ठराव केंद्र सरकारकडे रजिस्ट्रार जनरल तसेच राज्य सरकारकडे पाठवावा. जेणेकरून ओबीसी समाजाप्रति केंद्र सरकार जागृत होईल. ओबीसीचा फक्त मतदानापुरता वापर न करता ओबीसी समाजाचा विकासाकडे केंद्र सरकार लक्ष देणार, असेही निवेदनात म्हटले आहे. नगरसेवक सचिन भोयर यांनी हा ठराव तयार करून सर्वपक्षीय नगरसेवकांच्या स्वाक्षºया घेतल्या.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जाती