शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

कन्हाळगाव अभयारण्यासाठी हालचाली वाढल्या

By admin | Updated: July 10, 2014 23:31 IST

ताड़ोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या बझर झोनमधील गावांचा प्रश्न अद्यापही सुटला नसताना नव्याने कन्हाळगाव या अभयारण्याच्या निर्मीतीसाठी शासनस्तरावर आणि वनविभागाच्या स्तरावर हालचाली

चंद्रपूर : ताड़ोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या बझर झोनमधील गावांचा प्रश्न अद्यापही सुटला नसताना नव्याने कन्हाळगाव या अभयारण्याच्या निर्मीतीसाठी शासनस्तरावर आणि वनविभागाच्या स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारच्या वनविभागाने यासाठी २६ हजार ५०१ हेक्टर वनक्षेत्रात हे अभयारण्य उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात अद्याप अधिसूचना निघालेली नसली तरी, सर्व तयारी मात्र अंतीम टप्प्यात आली आहे.या अभयारण्याच्या निर्मीतीला अजूनतरी काही काळ अवधी असला तरी, यासाठी आतापासूनच विरोधाचा सूर उमटणे सुरू झाले आहे. विधान परिषद सदस्य शोभाताई फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या अभयारण्यासाठी आपला विरोध व्यक्त करून भविष्यात स्थानिक जनतेचे आंदोलन उभारण्याची तयारी दर्शविल्याने हा मुद्दा भविष्यात संघर्षाचा ठरणार असे चित्र दिसत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, बफर झोन असे मिळून तीन हजार किलोमीटरचे जंगल असूनही नव्या अभयारण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या अभयारण्याच्या विरोधामागील कारण सांगताना शोभाताई फडणवीस म्हणाल्या, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, आणि मूल, तालुक्यातील शेतकऱ्यांवर त्याचा परिणाम होणार आहे. कोठारी वनपरिक्षेत्र आणि मूल तालुक्यातील भेजगाव ते बेंबाळ तसेच पोंभूर्णा तालुक्यातील गावे निस्तार हक्कापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. वन्य प्राण्यांसाठी अभयारण्य तयार करून आदिवासींना बेघर करण्याचे धोरण सरकारने आखले असावे, अशी टिका फडणवीस यांनी यावेळी केली. बल्लारपूर, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, मूल तालुक्यातील जनतेने याचा विरोध करावा, आवश्यक्ता भासल्यास याविरूद्ध न्यायालयात दाद मागू, असेही त्या म्हणाल्या. (जिल्हा प्रतिनिधी)