शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

By admin | Updated: September 4, 2016 00:49 IST

स्थानिक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीदरम्यान प्राध्यापकाने...

गुन्हा दाखल : प्राध्यापकाची विद्यार्थ्याला मारहाणचंद्रपूर : स्थानिक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीदरम्यान प्राध्यापकाने एका विद्यार्थ्याला शुक्रवारी बेदम मारहाण केली. त्यावरून महाविद्यालयात तणाव निर्माण झाला होता. त्या विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर रामनगर पोलीस ठाण्यात प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर शनिवारी धरणे देऊन निदर्शने केली. पोलीस शुक्रवारी उशिरा रात्री प्रा. पेचे यांचा शोध घेण्यासाठी गेले असता ते सापडले नाही.शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारी निवडणूक होती. त्यामध्ये बी.ई. (इलेक्ट्रिकल) अतिंम वर्षांचा विद्यार्थी महेंद्र वावरकर याने उमेदवारी दाखल केली होती. निवडणूक असल्याने तो महाविद्यालयाच्या पटांगणातील मतदानकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभा होता. त्यावेळी प्रा. राजेश पेचे यांना कुणी तरी वावरकर रस्त्यावर उभा राहून प्रचार करीत असल्याची माहिती दिली. त्यावरून चिडून प्रा. पेचे यांनी महेंद्र वावरकर याला पकडून बेदम मारहाण केली. या मारहाणीचा विरोध करीत वावरकर याने शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी प्रा. पेचे यांच्याविरोधात धक्काबुक्की केल्याचा गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)पेचे दीर्घ रजेवरप्रा. राजेश पेचे यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे प्रकरण पोलिसांत पोहोचल्यानंतर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य धीरज कपूर यांनी त्यांना दीर्घ रजेवर पाठविले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य रजेवर असल्याने प्रा. कपूर यांच्याकडे पदभार आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना निवेदन सादर करण्यास सांंगितले. परंतु विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रशासनावर विश्वास राहिला नसल्याचे स्पष्ट करून निवेदन देण्यास नकार दिला.यापूर्वीही अनेकांना मारहाणप्रा. राजेश पेचे यांनी यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याची तक्रार करण्यात आल्यानंतरही महाविद्यालय प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी प्रा. पेचे यांना निलंबित केल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार केला आहे.