गौरक्षण वॉर्डात विविध समस्यांचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:27 IST2021-09-11T04:27:56+5:302021-09-11T04:27:56+5:30

बल्लारपूर: शहरातील मुख्य मार्गावर लागून असलेल्या दत्त मंदिरापासून ते सरकारी अनाज भांडारपर्यंतच्या परिसरात अनेक वर्षांपासून लोकांची घरे असून ...

Mountain of various problems in Gaurakshan ward | गौरक्षण वॉर्डात विविध समस्यांचा डोंगर

गौरक्षण वॉर्डात विविध समस्यांचा डोंगर

बल्लारपूर: शहरातील मुख्य मार्गावर लागून असलेल्या दत्त मंदिरापासून ते सरकारी अनाज भांडारपर्यंतच्या परिसरात अनेक वर्षांपासून लोकांची घरे असून त्यांना वीज, पाणी, गटाराचे पाणी जाण्याची सोय नसल्यामुळे त्यांच्यासमोर समस्यांचा डोंगर उभा आहे. समस्या त्वरित सोडविण्यात यावी म्हणून आम आदमी पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांना निवेदन देण्यात आले आहे.

गौरक्षण वाॅर्डातील परिसरात खूप ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नगरपरिषदेने केली नाही. याशिवाय रस्तेही खूप खराब, घाण पाणी जाण्यासाठीसुद्धा नाल्याची व्यवस्था नाही. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून रोगराई पसरत आहे. वीज खांब नसल्यामुळे येथील नागरिकांना रात्री-बेरात्री जीव मुठीत घेऊन रस्त्याने जावे लागते. परंतु, नगरपरिषद या परिसरातील नागरिकांकडून मालमत्ताकर बरोबर वसूल करते व कोणत्याही प्रकारची सुविधा देत नाही आणि साफसफाईसुद्धा केली जात नाही. या परिसरातील लोकांनी वेळोवेळी नगरसेवकाच्या माध्यमातून नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले, तरीसुद्धा या परिसराकडे कोणीही लक्ष देत नाहीत. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे जनतेला खूप समस्यांचा सामना करावा लागत आहे. शहरात करोडो रुपये खर्च करून काही ठिकाणी सिमेंट रोड बनविले जात आहेत, पण जिथे गरज आहे तिथे दुर्लक्ष करण्यात येत आहे. जनहितासाठी आम आदमी पार्टीने गौरक्षण वाॅर्डातील समस्या त्वरित सोडविण्याची मागणी नगरपरिषदेकडे केली आहे, अन्यथा या विषयाला घेऊन जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

निवेदन देताना अध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, अफजल अली, ॲड. पवन वैरागडे, आसिफ शेख, नीलेश जाधव, शुभम जगताप, सुधाकर गेडाम, आदर्श नारायणदास, इर्शाद अली, महिलाएं अध्यक्ष अल्का वेले यांची उपस्थिती होती.

100921\img-20210910-wa0290.jpg

मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांना निवेदन देताना आप चे कार्यकर्ते

Web Title: Mountain of various problems in Gaurakshan ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.