शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

मांडवाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून विनयभंग

By admin | Updated: June 3, 2015 01:39 IST

कंत्राटी आरोग्य सेविकेला रजा हवी यासाठी ती वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कक्षात गेली असता तिचा कथितरित्या विनयभंग करून...

आरोग्यसेविकेची तक्रार : प्रकरण पोहोचले ठाण्यातकोरपना : कंत्राटी आरोग्य सेविकेला रजा हवी यासाठी ती वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कक्षात गेली असता तिचा कथितरित्या विनयभंग करून शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर प्रकार मंगळवारी कोरपना तालुक्यातील मांडवा प्राथमिक आरोग्य केंद्रात घडल्याची घटना घडली.सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, कोरपना तालुक्यातील आदिवासी बहुल मांडवा प्राथमिक आरोग्य केंद्रात आज मासिक बैठक होती. या बैठकीला सदर आरोग्य केंद्रातील स्थायी तसेच कंत्राटी आरोग्य सेविका उपस्थित होत्या. बैठक संपल्यानंतर एक कंत्राटी आरोग्य सेविका येथील डॉ.दडमल यांच्या कक्षात जाऊन तिने दोन दिवसाची रजा देण्याची विनंती केली. तेव्हा डॉ.दडमल यांनी तिचा कथितरित्या हात पकडून दोन काय चार दिवसांची रजा देईन, मात्र तू मला शरीरसुख द्यायला हवे, अशी अफलातून मागणी केली. तिने डॉक्टरने पकडलेला हात झिडकावून आरडाओरड केली. ही ओरड ऐकून कक्षाबाहेर असलेल्या पाच-सहा आरोग्य सेविका धाऊन गेल्या. या झटापटीत सदर आरोग्य सेविकेच्या हातातील बांगड्या फुटल्या व ती रडत होती. इतर आरोग्य सेविकांनी तिला कक्षाबाहेर आणून विचारणा केली असता तिने हा प्रगकार सांगितला. दरम्यान, एका आरोग्य सेविकेने डॉक्टरच्या कानशिलात लगावली. इतर आरोग्य सेविकांनी तिला बाहेर काढले. त्या सेविकेने चपला काढून प्रसाद देणे सुरू केले होते.बैठकीला बाहेर उपस्थित असलेल्या पीडित आरोग्य सेविकेच्या पतीला हा प्रकार समजताच त्याचाही पारा चढला, मात्र इतर आरोग्यसेविकांनी त्याची समजूत काढून शांत केले. या गंभीर प्रकाराबाबतची तक्रार दाखल करण्यासाठी पिडीत, तिचा पती व पाचसहा आरोग्य सेविकांनी कोरपना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. ठाणेदार कोरपना यांनी सर्वांचे बयान दाखल करून पिडीतासोबत मांडवा आरोग्य केंद्राला भेट दिली व चौकशी सुरू केली आहे. (तालुका प्रतिनिधी)