शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

वाषिक आमसभेत विविध समस्यांवर आमदारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By admin | Updated: March 2, 2015 01:10 IST

भद्रावती पंचायत समितीची वार्षिक आमसभा बाळू धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक ग्रामोदय संघाच्या सभागृहात पार पडली.

भद्रावती : भद्रावती पंचायत समितीची वार्षिक आमसभा बाळू धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक ग्रामोदय संघाच्या सभागृहात पार पडली. ग्रामसभेत लोकप्रतिनिधी तथा नागरिकांकडून आलेल्या तक्रारीनुसार आमदार बाळू धानोरकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आमसभेत अनुपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांना त्वरित कारणे दाखवा नोटीस देण्याचे त्यांनी संवर्ग विकास अधिकारी मानकर यांना सांगितले. विकासासाठी लोकप्रतिनिधी व कर्मचारी यांच्यात खेलीमेळीचे वातावरण आवश्यक असल्याचे ते म्हणाले. तसेच कोणत्याही अडचणी असल्यास एक मित्र, एक सोबती म्हणून आपल्यापर्यंत त्या पोहचवाव्या, त्या सुचनांचा नक्कीच विचार करण्यात येईल असेही आ. धानोरकर म्हणाले.याप्रसंगी व्यासपिठावर पं.स. सभापती इंदू नन्नावरे, उपसभापती निशा रॉय, संवर्ग विकास अधिकारी मानकर, जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, पंचायत समितीचे सदस्य पंढरी चौधरी, शेखर रंगारी, सुधाकर आत्राम, भानुदास गायकवाड, सुधाकर नन्नावरे उपस्थित होते.कृषी, लेखा, पंचायत, शिक्षण, बांधकाम, आरोग्य, पशुसंवर्धन, सिंचन, पाणीपुरवठा विभाग, स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना, एकात्मिक बाल विकास योजना, ग्रामीण पाणी पुरवठा या विभागाच्या विभागनिहाय वाचन करण्यात येवून आलेल्या तक्रारीना उत्तरे देण्यात आली.आरोग्य विभागातील सर्व अहवाल इंग्रजीत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना ते समजायला कठीण जातात ते अहवाल मराठीत का नाही, असा सवाल जि.प. सदस्य विजय वानखेडे यांनी उपस्थित केला. स्वॉईन फ्ल्यू आजाराबाबत काय उपाययोजना केली, तसेच शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे जनजागृतीचे कार्यक्रम राबविलेला का? असे आ.धानोरकर यांनी विचारले असता, संबंधित अधिकारी समाधानकारक उत्तरे देवू शकले नाही. तालुक्यातील गुडगावच्या बाबतीत अधिकारी चुकीची व दिशाभुल करणारी माहिती देत असल्याचे माधव जिवतोडे म्हणाले. (तालुका प्रतिनिधी)