शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी अधिकाऱ्यांना सुनावले

By admin | Updated: March 2, 2015 01:12 IST

जखमी रुग्णांना रेफर करण्याची परंपरा येथील उपजिल्हा रुग्णालयात मागील कित्येक वर्षापासून सुरू आहे. रुग्णालयातून मृतदेह रेफर केले जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच ...

वरोरा: जखमी रुग्णांना रेफर करण्याची परंपरा येथील उपजिल्हा रुग्णालयात मागील कित्येक वर्षापासून सुरू आहे. रुग्णालयातून मृतदेह रेफर केले जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच याची दखल घेत आमदार धानोरकर यांनी विविध विभागाची आमसभा घेतली. या सभेत त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनाविले. येथील बावणे मंगल कार्यालयात सर्वच शासकीय विभागाची आमसभा आमदार बाळू धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मंचावर पं. स. सभापती सुनंदा जिवतोडे, जि.प. सदस्य नितीन मत्ते, डॉ. विजय देवतळे, पं.स. उपसभापती गजानन चांदेकर, पं.स. सदस्य अविनाश ठेंगळे, नगरसेवक राजू महाराज, माजी पं.स. उपसभापती दत्ता बोरेकर, माजी नगरसेवक खेमराज कुरेकार आदी उपस्थित होते. आमसभेमध्ये अनेक गावातील अंगणवाडी इमारतीसाठी मागील वर्षी निधी प्राप्त झाला. तरीपण इमारती बांधकाम पूर्ण झाले नाही, ही बाब उपस्थित ग्रामस्थांनी आमदार बाळू धानोरकर यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना विचारले असता, उत्तरे देताना उपस्थित शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची दमछक होताना दिसली. मार्च महिन्यापूर्वी इमारतीचे बांधकाम पूर्ण करा तसेच बांधकामात दिरंगाई करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याचे निर्देश दिले, आमदार धानोरकर यांनी यावेळी दिले. त्यानंतर वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयातील कारभाराचा मुद्दा समोर येताच आ. धानोरकर यांनी ‘लोकमत’ मध्ये प्रकाशित वृत्ताची दखल घेत चांगलेच संतप्त झाले. वरोरा सारख्या उपजिल्हा रुग्णालयातून मृतदेह रेफर केले जात असतील तर ग्रामीण भागातील रुग्णालयाचा कारभार कसे चालत असणार, हे न विचारलेलेच बरे, असे सांगत मृतदेह ठेवण्याचे फ्रिजर दुरूस्त होणार करणार कधी, अतिरिक्त फ्रिजर का मागितले नाही, त्याचा पाठपुरावा केला काय, अशा अनेक प्रश्नाचा भडीमार आ. धानोरकर यांनी अधिकाऱ्यांवर केला.मात्र, अधिकारी निरुत्तर होते. यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा सज्जड दमही आमादर धानोरकर यांनी यावेळी दिला. सभेला अनेक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)