शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

पालावरच्या शाळेतील बेपत्ता विद्यार्थी वर्धा जिल्ह्यात गवसले

By admin | Updated: December 25, 2015 00:23 IST

पिढ्यानंपिढ्या भटकंती करीत असल्याने शिक्षणाचा आजच्या पिढीला गंध नाही. अशा ५० मुल-मुलींंना वरोरा पंचायत शिक्षण विभागाने सोबत घेवून वरोरा येथे पालावरची शाळा...

जाम येथे शाळा सुरू : शिक्षण विभागाला यशवरोरा : पिढ्यानंपिढ्या भटकंती करीत असल्याने शिक्षणाचा आजच्या पिढीला गंध नाही. अशा ५० मुल-मुलींंना वरोरा पंचायत शिक्षण विभागाने सोबत घेवून वरोरा येथे पालावरची शाळा सुरू करीत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम सुरू केले. महिनाभर शाळा सुरू राहिली. मात्र एका रात्री विद्यार्थी बेपत्ता झाले होते. या बेपत्ता विद्यार्थ्यांचा वरोरा पंचायत समिती शिक्षण विभागाने वर्धा जिल्ह्यात शोध घेवून तेथील शिक्षण विभागाशी सन्मवय साधला व जाम येथे पालावरची शाळा सुरू केली आहे.दिवाळीच्या पूर्वी वरोरा शहरालगतच्या बोर्डा ग्रामपंचायत हद्दीमध्ये २५ भटकंती कुटुंब वास्तव्यास आले. भटकंती कुटुंबातील पुरुष मंडळी दिवसभर जडीबुटी विकायचे महिला व मूल दिवसभर झोपड्यावर राहायचे. या झोपड्यामध्ये ५० मुले-मुली होते. गटशिक्षणाधिकारी रामराव चव्हाण व त्यांचे सहकारी तसेच जिल्हा परिषद सदस्य नितीन मत्ते यांनी भटकंती करणाऱ्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांच्याशी जवळीक साधत ते जिथे वास्तव्यास आहे, त्याठिकाणी दिवाळीच्या दिवसात पालावरची शाळा सुरू केली. दररोज शिक्षक येवून मुलांना शिस्तीचे धडे व त्यांच्या भाषेत शिकविणे सुरू केले. लोक सहभाग व शिक्षण विभागाच्या वतीने पालावरच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. भटकंती करणारे कुटुंबे असल्याने ते एक दिवस निघून जातील व त्यांच्या शिक्षणात खंड पडणार अशी भीती होती. परंतु, याची पंचायत समितीच्या विषय तज्ञांना तमा नव्हती. त्यांनी आपले विद्यार्जनाचे काम सुरू ठेवले. गाव सोडून जाताना त्यांच्या पालकांना विषयतज्ञ पुर्व वारंवार सूचना देत होते. परंतु, एकाच रात्रीत पालावरची शाळा, विद्यार्थी व त्यांचे कुटुंब बेपत्ता झाले. शिक्षक नियमित वेळेवर गेले असता, सर्वच बेपत्ता झाल्याचे दिसून आल्याने शिक्षक काही काळ हिरमुले होते. अचानक विद्यार्थी निघून गेल्याने त्यांना पुढील शिक्षणाकरीता देण्यात येणारे शिक्षण हमीपत्रही देण्यात आले नाही. मात्र या कुटुंबांचा शोध घेण्यात यश आले असून जाम येथे पालावरची शाळा सुरू करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)एक महिना शिकविल्यानंतर मुले अचानक बेपत्ता झाल्याने निराश झालो होतो. परंतु त्यांचा शोध घेवून त्यांच्याकरीता जाम येथे पालावरची शाळा सुरू करण्यात यशस्वी झालो व ते विद्यार्थी जाम येथे शिक्षण घेत असल्याचे प्रत्यक्ष बघून आनंद झाला.- खुशाल पाचभाईविषयतज्ञ्ज, वरोरा पं.स.