शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट उद्योगातील कामगारांना किमान नवीन वेतनश्रेणी लागू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 05:00 IST

सिमेंट उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना परिपत्रकाच्या आधारे अल्प वेतन देऊन त्यांचे शोषण होत आहे. वाढती महागाई व कोरोनामुळे नागरिक त्रस्त झाले असून आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे कामगारांच्या किमान वेतनात वाढ करणे आवश्यक आहे. त्यासाठी कामगारांना लागू करण्यात आलेल्या समान किमान वेतन परिपत्रकात बदल करून सिमेंट उद्योगतील कामगारांना नवीन वेतन श्रेणी लागू करणे, २१ हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे, अशी मागणी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. 

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : परिपत्रात बदल करण्यास कामगार मंत्र्यांचा होकार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सिमेंट व त्यावर आधारीत उद्योगातील कामगारांना किमान समान वेतन लागू आहे. मात्र, कंपन्यांकडून त्यांना अल्प वेतन दिले. त्यामुळे परिपत्रकात बदल करून कामगारांना २१ हजार रूपये किमान वेतनात वाढ मागणी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली असता परिपत्रकात बदल करण्याचे तत्वतः मान्य केले. त्यामुळे लवकरच किमान नवीन वेतनश्रेणी लागू होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.सिमेंट उद्योगातील कामगारांना किमान वेतन वाढ व किमान वेतन परिपत्रकात दुरूस्ती करून किमान नवीन वेतन श्रेणी लागू करण्यासाठी कामगार मंत्री मुश्रीफ यांच्या मुुंबई येथील दालनात बैठक पार पडली. यावेळी कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल, कामगार आयुक्त कल्याणकर उपस्थित होते.सिमेंट उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना परिपत्रकाच्या आधारे अल्प वेतन देऊन त्यांचे शोषण होत आहे. वाढती महागाई व कोरोनामुळे नागरिक त्रस्त झाले असून आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे कामगारांच्या किमान वेतनात वाढ करणे आवश्यक आहे. त्यासाठी कामगारांना लागू करण्यात आलेल्या समान किमान वेतन परिपत्रकात बदल करून सिमेंट उद्योगतील कामगारांना नवीन वेतन श्रेणी लागू करणे, २१ हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे, अशी मागणी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. 

कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे वेधले लक्षसिमेंट व त्यावर आधारित उद्योगांमध्ये कार्यरत हजारो मजुरांचे बरेच प्रश्न कायम आहेत. जिल्ह्यात उद्योगांचा विस्तार व रोजगाराची निर्मिती व्हावी, यासाठी कामगारांचे प्रश्न सुटणे गरजेचे आहे. या दोन्ही घटकांमध्ये योग्य सुसंवाद राहावा, यादृष्टीने राज्य शासनाकडून प्रयत्न आहे, अशी माहितीही बैठकीत देण्यात आली.

जिल्ह्यातील २० हजार कामगारांना लाभ चंद्रपूर जिल्ह्यात अल्ट्राटेक, माणिकगड, एसीसी, अंबूजा व दालमिया हे पाच सिमेंट उद्योग आहेत. यामध्ये किमान १५ ते २० हजार कामगार काम करतात. सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारित उद्योगातील कामगारांना समान किमान वेतन लागू करण्याचे एक परिपत्रक आहे. या परिपत्रकाचा आधार घेऊन सिमेंट उद्योगामध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना अल्प वेतन मिळत असल्याची बाब कामगार संघटनेच्या अध्यक्ष शिवानी वडेट्टीवार, विजय ठाकरे, किशोर भोयर, नारोटतं बाराई, सुधाकर तेजाने, गौतम भासरकर, सुनील धावस, दशरथ राऊत आदींनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार