लॉकडाऊनमुळे स्थलांतरण करणारे मेंढपाळ अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 11:23 AM2020-06-09T11:23:24+5:302020-06-09T11:23:56+5:30

पावसाळ्याच्या तोंडावार मेंढपाळ व्यावसायिक चारापाणी व निवाऱ्यांच्या शोधार्थ मूळगावाहून कमी पाऊस मनाच्या प्रदेशात स्थलांतरीत होतात. पोटापाण्यासाठी कुटुंबासह अडीच तीन महिने भटकंती करणारे तांडे लॉकडाऊनमुळे बाहेरगावी जाऊ शकले नाहीत.

Migratory shepherds in trouble due to lockdown | लॉकडाऊनमुळे स्थलांतरण करणारे मेंढपाळ अडचणीत

लॉकडाऊनमुळे स्थलांतरण करणारे मेंढपाळ अडचणीत

googlenewsNext
ठळक मुद्देचारापाणी व निवाऱ्याचा प्रश्न गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर नुकतीच पावसाने जोराची हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसाळा तोंडावार चारापाणी आणि उपजीविकेच्या शोधार्थ जिल्हा राज्याच्या बाहेर जाणाऱ्या मेंढपाळ व्यावसायिकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अलीकडच्या काळात अनेक समस्यांमुळे मेंढपाळ व्यवसाय अडचणीत येऊ लागत आहे.
पावसाळ्याच्या तोंडावार मेंढपाळ व्यावसायिक चारापाणी व निवाऱ्यांच्या शोधार्थ मूळगावाहून कमी पाऊस मनाच्या प्रदेशात स्थलांतरीत होतात. पोटापाण्यासाठी कुटुंबासह अडीच तीन महिने भटकंती करणारे तांडे लॉकडाऊनमुळे बाहेरगावी जाऊ शकले नाहीत. त्यात पावसाळा तोंडावर मान्सूनपूर्व पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने शिवारात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे जनावरांचा चारा निवाऱ्याचा गंभीर प्रश्न होऊन जोरदार पावसामुळे शेळ्या मेंढ्यांना रोगराईचा धोका होऊ शकतो. आशा अनेक समस्यांत भर पडू लागल्याने आता कस जगायच? असा प्रश्न या मेंढपाळांना पडला आहे. परराज्यातील मेंढपाळ व्यावसायिक चारापाणी व निवाऱ्याच्या शोधार्थ चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा, वरोरा, नागभीड, मूल, सिंदेवाही येतात. यंदा लॉकडाऊ न व मान्सूनपूर्व पावसात मेंढपाळ अडकल्याने विविध समस्यांना सामोर जावे लागत आहे. दिवसेंदिवस वाढत्या संकटांमुळे पारंपारिक मेंढपाळ व्यवसाय तोट्यात येऊ लागला आहे. त्यामुळे स्थानिक चराऊ गायरान खुली करून निवाºयाची परवानगी द्यावी, अशी मागणी मेंढपाळांकडून होत आहे.

Web Title: Migratory shepherds in trouble due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.