शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीतील उद्योगांना महागाईचा फटका

By admin | Updated: September 13, 2014 23:47 IST

शासनाचे अन्यायकारक औद्योगिक धोरण, वीज, कोळशाचा अपुरा पुरवठा तसेच दरवाढ आदी कारणांमुळे चंद्रपूर एमआयडीसीतील लहान-मोठे उद्योग बंद पडत असून मागील काही वर्षांत येथील तब्बल

चंद्रपूर : शासनाचे अन्यायकारक औद्योगिक धोरण, वीज, कोळशाचा अपुरा पुरवठा तसेच दरवाढ आदी कारणांमुळे चंद्रपूर एमआयडीसीतील लहान-मोठे उद्योग बंद पडत असून मागील काही वर्षांत येथील तब्बल दीडशेंवर उद्योग बंद झाल्याची माहिती एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा यांनी चंद्रपूर येथे पत्रपरिषदेत दिली.चंद्रपूर जिल्ह्यात आणि शहरात मागील दोन वर्षात उद्योगांचा विकास नगण्य झाला आहे. जिल्ह्यातील उद्योगांकडे होणारे शासनाचे दुर्लक्ष, वीज दरवाढ आणि कोळशाचा अपुरा पुरवठा यासह प्रदूषणाचे कारण पुढे करून जिल्ह्यात नवीन उद्योगांना असलेली बंदी यामुळे औद्योगिक विकास खुंटला आहे. याचा फटका जुन्या उद्योगांना बसत असून अनेक उद्योग बंद झाले आहेत तर, काही उद्योजकांवर सुरू असलेले उद्योग बंद करण्याची वेळ आली आहे. एमआयडीसीमध्ये सुरुवातीला २३५ उद्योग सुरू झाले होते. मात्र, नंतरच्या काळात दीडशेंवर उद्योग बंद झाले असून आजमितीस केवळ ८० उद्योग सुरू आहेत. यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून अनेक युवकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक विकास वाढीला प्रोत्साहन देण्याची गरज असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी हा विषय विधानसभा, लोकसभेत रेटावा अशी मागणी रुंगठा यांनी केली.शासनाच्या उदासीन धोरणामुळे ग्रीस इंडस्ट्रीज, चमन मॅटेलिक, कोल वॉशरिज यासारखे मोठे उद्योग बंद झाले आहेत. त्यामुळे हजारावर युवकांना बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. ताडाळी एमआयडीसी येथे नवीन उर्जा प्लांट उभारण्यात आला आहे. परंतु थर्मल पॉवर स्टेशनचे पीपीए न झाल्यामुळे ऊर्जा निर्मिती प्लांट बंद पडत आहेत. मूल एमआयडीसीतील उद्योगधंदेही बंद होत आहेत. अशावेळी जिल्ह्यातील उद्योगवाढीला प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे. चंद्रपूर हे औद्योगिकदृष्ट्या विदर्भातील नागपूरनंतर दुसरे महत्त्वाचे शहर आहे. विदर्भातील सर्वाधिक महसूल देणारे शहर असून कोळसा खाणी, जंगल, पाणी व अन्य खनिज संपत्ती विपूल प्रमाणात आहे. आंध्रप्रदेश, छत्तीसगड राज्याच्या सीमाजवळ असल्याने या राज्यातील उद्योजकांना चंद्रपूर येथे विविध उद्योगात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित करता येणार आहे.मात्र, राज्यशासन जिल्ह्यातील उद्योगधोरणाविषयी गंभीर नसल्याचा आरोप रुंगठा यांनी केला. यावेळी श्याम कुंदोजवार, प्रदीप बुक्कावार, राजेंद्र चौबल, शेख रहेमान पटेल आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)