शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

टक्केवारीच्या गणितात शेतकऱ्यांची गळचेपी

By admin | Updated: March 18, 2015 01:20 IST

खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर रबी हंगामावर आशा ठेवून असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. यावर्षी रबी पिकाला सतत अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

चंद्रपूर : खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर रबी हंगामावर आशा ठेवून असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. यावर्षी रबी पिकाला सतत अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, शासनाचे अनुदानासाठी ठरवलेले निकष शेतकऱ्यांसाठी गळचेपी ठरत असल्याने नुकसान होऊनही जिल्ह्यातील शेतकरी मात्र शासकीय मदतीस अपात्र ठरले आहेत.रबी हंगाम ऐन हातात आलेला असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशावर पाणी फेरले. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या चारही महिन्यात अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे गहू, हरभरा, तूर, सोयाबीन, कापूस आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. गहू पिक वादळामुळे जमीनीवर झोपले. तर कापूस पिकांचे बोंड पावसामुळे काळे पडले. हरभरा पिकालाही माती लागल्याने त्याची पत घसरली. नुकसानग्रस्त भागाचे सर्व्हेक्षण कृषी विभागाने केले. मात्र या सर्व्हेक्षणात नुकसानीची टक्केवारी ही ५० टक्के पेक्षा कमी आली आहे. त्यामुळे शेतकरी मदतीस अपात्र ठरले आहेत.शासनाच्या निकषानुसार नुकसान भरपाईसाठी ५० टक्के पेक्षा जास्त नुकसान होणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसानीची टक्केवारी ही ५० टक्केच्या आत आली आहे. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल याची कोणतीही आशा नाही. तसे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचेही म्हणणे आहे.शासनाचे निकष शेतकऱ्यांसाठी मारक ठरत असल्याने नुकसान होऊनही शासनाच्या आर्थिक मदतीसाठी शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार असल्याचे शेतकरी आजही कसे जगावे, या विवंचनेत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)कृषी विभाग म्हणतो, नुकसान निरंकयावर्षी रबी पिकांना अवकाळी पावसाचा फटका चार ते पाच वेळा बसला असला तरी, यात कोणतेही नुकसान झालेले नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. नुकसानीचा अहवाल निरंक असून शासनाकडून मदत मिळेल अशी कोणतीच अपेक्षा नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जमीन शाखेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.फक्त तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांचे नुकसान जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिलेल्या नजरअंदाज अहवालात फक्त तीन तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. यात चंद्रपूर तालुक्यात हरभरा पिकाचे ७० हेक्टरवर नुकसान व गहू पिकाचे २२५ हेक्टरचे नुकसान, ब्रह्मपुरी तालुक्यात हरभराचे १५९ हेक्टर व गहू पिकाचे ७७ हेक्टर व इतर पिकाचे ३२०७ हेक्टर तर सिंदेवाही तालुक्यात हरभरा पिकाचे ३० हेक्टरवर व गहू पिकाचे २५ हेक्टरवर नुकसान झाले आहे. ही टक्केवारी ५० च्या आत आहे.वीज पडून दोन गायी ठारसोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे वीज पडून दोन गायी ठार झाल्याची घटना कोरपना तालुक्यातील पारडी येथे घडली. सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास भास्कर राऊत यांच्या दोन गायींवर वीज पडल्याने त्या मृत्यूमुखी पडल्या. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले असून आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.