शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

माता चवडेश्वरी मंदिरासाठी निधी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 05:00 IST

जीर्णोद्धाराचे काम तात्काळ पूर्ण व्हावे, याकरिता पाच लाखांचा निधी देणार, अशी घोषणा आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी केली. नागभीड परिसरातील जनेतेचे श्रध्दास्थान असलेल्या नागभीड येथील चवडेश्वरी माता मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते.

ठळक मुद्देकीर्तीकुमार भांगडिया : जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : माता चवडेश्वरी देवीचा आशीर्वाद भाविकांसाठी उपकारक ठरला असून देवीच्या मंदिराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. जीर्णोद्धाराचे काम तात्काळ पूर्ण व्हावे, याकरिता पाच लाखांचा निधी देणार, अशी घोषणा आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी केली.नागभीड परिसरातील जनेतेचे श्रध्दास्थान असलेल्या नागभीड येथील चवडेश्वरी माता मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. राजन जयस्वाल तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष प्रा. डॉ. उमाजी हिरे, उपाध्यक्ष गणेश तर्वेवर, जि.प.सदस्य संजय गजपुरे, वसंत वारजूरकर, पंजाबराव गावंडे, प्रा. डॉ. अमीर धम्मानी, सभापती प्रणया गड्डमवार, व्यापारी संघाचे अध्यक्ष गुलजार धम्मानी, हनिफभाई जादा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्र्रशेखर विगम, प्रभाकर मेडपीलवार, अनिल लांबट, हरिभाऊ गरफडे, श्याम पाथोडे आदींची उपस्थिती होती. आमदार कीर्तीकुमार भांगडिया म्हणाले, नागभीड शहराच्या विकासासाठी विविध योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला.त्यातील काही सुरू आहेत. नागरिकांच्या हिताकरिता सदैव तत्पर असल्याचेही त्यांनी नमुद केले. उपस्थित मान्यवरांनी मंदिराच्या इतिहासाबद्दल जुन्या आठवणींना उजाळा दिला.हे मंदिर सर्व जनतेचे असून सर्वांनी मदत करण्याचे आवाहन प्रा. डॉ. जयस्वाल यांनी केले. यावेळी चवडेश्वरी देवस्थान नागभीडच्या वतीने आमदार कीर्तीकुमार भांगडिया व पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल प्रणया गड्डमवार यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विजय बंडावार, संचालन पराग भानारकर यांनी केले. संजय पातेवार यांनी आभार मानले.

टॅग्स :Socialसामाजिक