शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नागभिडात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST

हातात मागण्यांचे विविध फलक घेऊन आणि मागण्यांच्या घोषणा देत हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने अतिशय शिस्तबद्ध निघाला. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोर्चा पोहचल्यानंतर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या सभेस आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया व जिल्हा भाजपाचे अध्यक्ष हरिश शर्मा यांनी संबोधित केले. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर केल्या नाहीत तर भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

ठळक मुद्देहजारो शेतकरी सहभागी : बंटी भांगडिया यांचे नेतृत्व

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरूवारी मोर्चा काढण्यात आला. तालुक्यातील हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांनी केले.या मोर्चाची सुरूवात तालुका भाजपाच्या कार्यालयातून करण्यात आली. हातात मागण्यांचे विविध फलक घेऊन आणि मागण्यांच्या घोषणा देत हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने अतिशय शिस्तबद्ध निघाला. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोर्चा पोहचल्यानंतर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या सभेस आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया व जिल्हा भाजपाचे अध्यक्ष हरिश शर्मा यांनी संबोधित केले. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर केल्या नाहीत तर भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यानंतर तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी मोर्चाला सामोरे येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले. या मोर्चात प्रामुख्याने वसंत वारजूकर, मोरेश्वर ठिकरे, न.प.चे अध्यक्ष प्रा.डॉ.उमाजी हिरे, कृउबासचे सभापती आवेश पठाण, न.प.उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, कृउबासचे उपसभापती रमेश बोरकर, न.प.सभापती सचिन आकूलवार, पं.स.सदस्य संतोष रडके, जि.प.चे माजी सभापती ईश्वर मेश्राम, माजी सभापती डॉ.मदन अवघडे आदी सहभागी झाले होते.या आहेत मागण्यासर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, श्रावणबाळ योजनेची वयोमर्यादा ६० वर्ष करण्यात यावी, अतिवृष्टीची २५ हजार रुपये प्रती हेक्टर नुकसानभरपाई देण्यात यावी, घरगुती व कृषिपंपांचे वीज बील माफ करण्यात यावे, नरभक्षक वाघांचा बंदोबस्त करण्यात यावा, अतिक्रमणधारकांना शेतीचे पट्टे देण्यात यावे, वर्ग २ मध्ये असलेल्या जमिनी वर्ग १ मध्ये करण्यात याव्या, गोसेखुर्द धरणाचे पाणी घोडाझरी तलावात सोडण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, कृउबासमध्ये धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस देण्यात यावा, वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानभरपाईत वाढ करण्यात यावी आदी विविध मागण्या शेतकºयांकडून यावेळी करण्यात आल्या.राममंदिर चौकात घोषणाराम मंदिर चौक नागभीडचा प्रमुख चौक आहे. या चौकात मोर्चा आल्यानंतर येथे मोर्चा थांबविण्यात आला व विविध घोषणा देण्यात आल्या. या घोषणांनी परिसर चांगलाच दणाणून गेला. दिवसभर या मोर्चाचीच चर्चा होती.सत्तेत येण्यापूर्वी शासनाने शेतकऱ्यांना जी वचने दिली, ती पूर्ण केल्याशिवाय, अतिवृष्टीची प्रति हेक्टर २५ हजार रुपये नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय आणि जे शेतकरी नियमित कर्जाचा भरणा करीत आहेत, अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.- कीर्तीकुमार भांगडियाआमदार, चिमूर विधानसभा क्षेत्र.

टॅग्स :Morchaमोर्चा