शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

मोठे होण्यासाठी खूप वाचन करा

By admin | Updated: December 21, 2015 01:11 IST

टिव्ही, पडदा वा नाटक यामध्ये कलावंत ज्या भूमिका करतात, प्रत्यक्ष जीवनातही ते तसेच असावेत आणि तसे असायलाच हवे, ....

सखी मंचतर्फे ‘ग्रेट भेट’ : प्रशांत दामले व तेजश्री प्रधानचा सखींना सल्लाचंद्रपूर : टिव्ही, पडदा वा नाटक यामध्ये कलावंत ज्या भूमिका करतात, प्रत्यक्ष जीवनातही ते तसेच असावेत आणि तसे असायलाच हवे, असे साधारणत: मानले जाते, मात्र, बहुधा तसं राहात नाही आणि तशी अपेक्षा करणे चूक आहे. प्रत्येक कलावंताचे आपले स्वतंत्र जीवन आणि विचार असतात. पात्रांचे स्वभाव लेखक ठरवितात आणि ते काल्पनिक असतात. त्यामुळे, पात्रात कलावंतांच्या खासगी जीवनाचा मेळ बसलाच पाहिजे असे होत नाही, अशी स्पष्ट करीत मोठे होण्यासाठी खूप आणि निरंतर वाचन केले पाहिजे, अस सल्ला सिनेअभिनेता प्रशांत दामले आणि ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील जान्हवी अर्थात तेजश्री प्रधान हिने चंद्रपूर येथे लोकमत सखी मंचच्या सदस्यांना दिला.लोकमत सखी मंचच्या वतीने शनिवारी प्रियदर्शिनी सभागृहात ‘ग्रेट भेट’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रशांत दामले आणि तेजश्री प्रधान यांनी सखींशी मनमोकळी चर्चा केली. प्रश्नोत्तराच्या या प्रवासात, तेजश्री प्रधान हिने अभिनय क्षेत्रात प्रवेश कसा झाला याबाबत सांगितले, ती म्हणाली, प्रारंभी दोन चित्रपट मिळाले. त्यानंतर ‘होणार सून..’ ही मालिका! या मालिकेने खूप नाव दिले. प्रेक्षकाचे प्रेम मिळाले. आता नाटकाकडे वळले आहे. चित्रपट, मालिका आणि नाटक यामधून नाटकात काम करताना कलावंतांच्या प्रतिमेचा कस लागतो. यात प्रेक्षकांपुढे थेट यावे लागते.अभिनय क्षेत्रात नव्याने पाय ठेवणाऱ्याने आरशापुढे उभे न राहता वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचावित त्यातून अभिनय शिकता येते. अभिनेता प्रशांत दामले यांनीही उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ‘आम्ही सारे खवैय्ये’ या त्यांच्या लोकप्रिय कार्यक्रमावरच अधिक प्रश्न होते. किचन हा माझा आवडीचा विषय असला तरी घरातील किचनमध्ये मला प्रवेश नाही, असे म्हणताच प्रेक्षकांमध्ये हशा पिकला. मला गायन क्षेत्रात जायचे होते. परंतु अभिनय क्षेत्रात आलो आणि येथेच रमला, असेही तो म्हणाला. संचालन लोकमतचे सहाय्यक उपसंपादक संतोष कुंडकर व लोकमत सखी मंचच्या जिल्हा संयोजिका पूजा ठाकरे यांनी केले. तत्पूर्वी, तेजश्री प्रधान व प्रशांत दामले यांनी स्वागत जिल्हा कार्यालय प्रमुख विनोद बुले, जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर, लोकमतचे ज्येष्ठ सदस्य डॉ.अशोक बोथरा, सरला बोथरा यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)