शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

२८८ वीज ग्राहकांना महावितरणचा दणका

By admin | Updated: December 26, 2016 01:12 IST

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर व गडचिरोली मंडळात खूप मोठ्या प्रमाणात वीज थकबाकी आहे.

वीजपुरवठा खंडीत : थकबाकीदारांविरोधात वीज कापण्याची मोहीम सुरू चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर व गडचिरोली मंडळात खूप मोठ्या प्रमाणात वीज थकबाकी आहे. याचा परिणाम वीज पुरवठ्यावर होत असल्याने चंद्रपूर, गडचिरोली, बल्लारपूर, वरोरा, ब्रम्हपुरी, आलापल्ली या सहाही विभागात थकबाकीदारांची वीज कापण्याची मोहीम वीज कंपनीने सुरू केली आहे. शनिवारच्या मोहीमेत पहिल्याच दिवशी तब्बल २८८ ग्राहकांची वीज कापून थकबाकीदारांना झटका देण्यात आला. त्यामुळे वीज बिलाचा वेळेत भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घरगुती, औद्योगीक व वाणिज्यीक थकबाकीदारांविरोधात वीजपुरवठा ख्ांडीत करण्याची ही धडक मोहीम असून या मोहिमेअंतर्गत एकाच दिवशी २८८ थकबाकीदार ग्राहकांचा १० लाखांच्या थकबाकीसाठी वीजपुरवठा ख्ांडीत करण्यात आला आहे. यात चंद्रपूर विभाातील ५२, बल्लारपूर विभागातील ३४, वरोरा विभागातील ११०, गडचिरोली ४३, आलापल्ली ८१ व ब्रम्हपुरी विभागातील ११ अशा एकंदरीत २८८ ग्राहकांचा समावेश आहे. तसेच ३ हजार ६२८ ग्राहकांकडून थकीत असलेले ४० रूपये थकीत बिलही वसुल करण्यात आले आहे. महावितरणचे वीजबिल आल्या आल्या प्रामाणिकपणे भरणाऱ्या तसेच वीज बिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्राहकांची विभागणी गेली आहे. वीजबिलाच्या वसुलीतूनच वसुल झालेल्या महसुलातून वीज खरेदी करणे व ती परत ग्राहकांना पुरविताना महावितरण थकबाकीदारामुळे अडचणीत येत आहे. परिणामी महावितरणला थकबाकीदार ग्राहकांविरोधात ही कारवाई करावी लागली आहे. आगामी काळात ही मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. या मोहिमेअंतगर्तत, बेकायदा वीजपुरवठा वापरणाऱ्या ग्राहकांवरही कठोर कारवाई करण्यात येत आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडीत ग्राहकांसाठी सुरू असलेल्या ‘नवप्रकाष योजनेचा’ कायमस्वरूपी वीजपुरवठा ग्राहकांनी लाभ घ्यावा. जबलाचा वेळेत भरणा करावा, असे आवाहन मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी) २२ कोटी ५६ लाखांची थकबाकी सध्या स्थितीत चंद्रपूर परिमंडळातील सहाही विभागात घरगुती, औद्योगिक व वाणिज्यीक ग्राहकांकडे २२ कोटी ५६ लाखांची थकबाकी आहे. यात चंद्रपूर विभागात ५ कोटी ४८ लाख, वरोरा विभागात ३ कोटी ६३ लाख, बल्लारपूर ५ कोटी ३९ लाख, आलापल्ली २ कोटी ४४ लाख, ब्रम्हपुरी २ कोटी १ लाख व गडचिरोली विभागात ३ कोटी ९ लाख रूपये थकबाकी आहे. ‘ना नफा, ना तोटा’ तत्वावर ग्राहकांपर्यंत वीज पोहोचविणाऱ्या महावितरणला थकबाकीची झळ सोसावी लागत आहे.