महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून २५ हजार ६२५ शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 05:00 AM2020-02-04T05:00:00+5:302020-02-04T05:00:43+5:30

विमा हप्ता, खर्चाची मर्यादा, मेडिकल प्रोसिजर्स, आर्थिक तरतूद, योजनेतील अंगीकृत रूग्णालये, रूग्णालयांनी सादर केलेले दावे व योजनेचा करार कसा असावा, याबाबतची संपूर्ण माहिती ४ ऑगस्ट २०१६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयात नमुद आहे. जिल्ह्यात २१ नोव्हेंबर २०१३ ते जानेवारी २०२० पर्यंत २५ हजार ६२५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये चंद्रपूर तालुक्यात सर्वाधिक ६ हजार ४३० शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

Mahatma Phule Jan Health Plan in 25 Thousand 625 Operation | महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून २५ हजार ६२५ शस्त्रक्रिया

महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून २५ हजार ६२५ शस्त्रक्रिया

googlenewsNext
ठळक मुद्देसात वर्षांची स्थिती : पाच रूग्णालयांना मिळाले ४७ कोटी १२ लाख ९६ हजार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दारिद्रयरेषेखालील व दारिद्रयरेषेवरील कुटुंंबांना गंभीर व खर्चिक आजारांवर मोफत करण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून जिल्ह्यात २१ नोव्हेंबर २०१३ ते जानेवारी २०२० पर्यंत २५ हजार ६२५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रियांसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयासह अन्य चार खासगी रूग्णालयांनी क्लिेम अमाऊंट म्हणून म्हणून तब्बल ४७ कोटी १२ लाख ९६ हजार ६२२ रूपयांचा लाभ घेतला आहे.
राजीव गांधी जीवनदायी योजनेची मुदत १ ऑक्टोबर २०१६ रोजी संपल्यानंतर याच योजनेच्या नवीन स्वरूपाला ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ असे नाव देण्यात आले आहे. ही आरोग्य योजना राज्यात २ ऑक्टोबर २०१६ पासून राबविली जात आहे. या योजनेतंर्गत दारिद्रयरेषेखालील पिवळे, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्ण योजना, शिधापत्रिकाधारक व दारिद्रयरेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक (१ लाखापर्यंत उत्पन्न असलेली) कुटुंबे (शासकीय, निमशासकीय कर्मचारी व आयकरदाते वगळून) याशिवाय शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी, महिला आश्रमातील महिला, अनाथालय, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक तसेच अधिस्विकृतीधारक पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येतो. लाभार्थ्यासाठी ओळख पटविण्यासाठी शासनाने आधारकार्ड व अन्य पुरावे निर्धारित केली आहेत. विमा हप्ता, खर्चाची मर्यादा, मेडिकल प्रोसिजर्स, आर्थिक तरतूद, योजनेतील अंगीकृत रूग्णालये, रूग्णालयांनी सादर केलेले दावे व योजनेचा करार कसा असावा, याबाबतची संपूर्ण माहिती ४ ऑगस्ट २०१६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयात नमुद आहे. जिल्ह्यात २१ नोव्हेंबर २०१३ ते जानेवारी २०२० पर्यंत २५ हजार ६२५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये चंद्रपूर तालुक्यात सर्वाधिक ६ हजार ४३० शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
२५ हजार ६२५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रियांसाठी जिल्हा सामान्य रूग्णालय आणि वासाडे हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल, मुसळे चाईल्ड हॉस्पिटल, सीएचएल या खासगी रूग्णालयांना क्लिेम रक्कम म्हणून तब्बल ४७ कोटी १२ लाख ९६ हजार ६२२ अदा करण्यात आल्याचे अहवालातून पुढे आले आहे.

खर्चाची मर्यादा
योजनेतंर्गत समाविष्ट उपचार पद्धतीवरील उपचारांसाठी कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्यांसाठी वार्षिक विमा संरक्षण रक्कम प्रतिवर्ष प्रति कुटुंब दोन लाख तर मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी सदर मर्यादा प्रति वर्ष प्रतिकुटुंब तीन लाख आहे. यामध्ये दात्यांचाही समावेश असेल. योजनेतंर्गत उपचार सुरू होण्यापूर्वी असलेल्या आजारांचा समावेश राहील.

योजनेतील शस्त्रक्रिया
‘महात्मा फुले जन आरोग्य योजनेत कान, नाक, घसा, नेत्ररोग, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, अस्थिरोग, पोट व जठर, कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जरी, बालरोग, प्रजनन व मूत्ररोग शस्त्रक्रिया, मज्जातंतू विकृती शास्त्र, कर्करोग शस्त्रक्रिया, वैद्यकीय कर्करोग, रेडीओथेरपी कर्करोग, त्वचा प्रत्यारोपण, जळीत, पॉलिट्रामा, प्रोस्थेसिस जोखिमी देखभाल, जनरल मेडिसीन, संसर्गजन्य रोग, बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन हृदयरोग, नेफ्रोलोजी, न्युरोलोजी, पल्मोनोलोजी, चर्मरोग चिकित्सा, रोमेटोलोजी, इंडोक्रायनोलोजी, मेडिकल गॅस्ट्रोइंट्रोलोजी आदी ३० विशेष सेवातंर्गत ९७१ उपचार, शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठपुरावा सेवांचा समावेश आहे.

Web Title: Mahatma Phule Jan Health Plan in 25 Thousand 625 Operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य