शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
3
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
4
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
5
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
6
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
7
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
8
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
9
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
10
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
11
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
12
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
13
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
14
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
15
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
16
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
17
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
18
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
19
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
20
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
Daily Top 2Weekly Top 5

हरवलेले बालक अखेर पालकांच्या स्वाधीन

By admin | Updated: March 22, 2015 00:05 IST

सकाळच्यावेळी आई-वडिलांची नजर चुकवून भटकलेले एक तीन वर्षीय बालक येथील पत्रकार संजय वरघने यांना सापडले.

चिमूर : सकाळच्यावेळी आई-वडिलांची नजर चुकवून भटकलेले एक तीन वर्षीय बालक येथील पत्रकार संजय वरघने यांना सापडले. वरघने व त्यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण शहर पिंजून काढून बालकाच्या आई-वडिलांचा शोध लावला. आणि त्यामुळे साऱ्यांचाच जीव भांड्यात पडला. मनीष गोपाल धांडे असे त्या बालकाचे नाव आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली.चिमूर शहरात एक तीन वर्षांचा मुलगा सकाळी ८ वाजताच्या सुमारास घरासमोर खेळत असताना भटकत-भटकत स्थानिक मटण मार्केटमध्ये पोहचला. त्यामुळे तो गांगरून गेला. तो रडत असल्याचे पाहून तेथील एका महिलेने त्या मुलाला ग्रामपंचायत सदस्य सचिन पचारे, सामाजिक कार्यकर्ते किशोर पत्तीवार व लोकमतचे तालुका प्रतिनिधी संजय वरघणे यांच्या स्वाधीन केले. त्यानंतर याबाबत पोलीस ठाण्यातही माहिती देण्यात आली. हरविलेल्या मुलाच्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी वरघणे व सुरेश भोयर, महेश कामडी, गजानन गोहणे यांनी चिमुरातील वॉर्ड पिंजून काढले. आठ तासानंतर अखेर नेहरू वॉर्डात सदर मुलाचे आईवडिल असल्याची माहिती मिळाली आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सदर बालक आईवडिलांसोबत चिमूर येथील मनोज सातपुते यांच्या घरी पाहुणे म्हणून आले होते. खेळताना तो भरकटल्याने आईवडील शोधाशोध करीत होते. मुलगा मिळत नसल्याने ते हादरून गेले होते. अखेर बालक सुखरूप मिळाल्याने त्यांनी सर्वांचे आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)