चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय मुलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 10:43 IST2018-11-25T10:36:50+5:302018-11-25T10:43:10+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. खुशी बंडू ठाकरे असे मुलीचे नाव आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय मुलीचा मृत्यू
ठळक मुद्देचंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.खुशी बंडू ठाकरे असे मुलीचे नाव आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथे रविवारी सकाळी 7 वाजता ही घटना घडली.
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. खुशी बंडू ठाकरे असे मुलीचे नाव आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथे रविवारी (25 नोव्हेंबर) सकाळी 7 वाजता ही घटना घडली.
खुशी रविवारी सकाळी घराबाहेर गेली असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला चढविला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचा माहिती मिळताच वनविभागाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय मुलीचा मृत्यू#leopard
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) November 25, 2018