शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

गोसीखुर्द धरणाचे पाणी घोडाझरी तलावात सोडा

By admin | Updated: December 4, 2015 01:24 IST

परिसरातील शेतकऱ्यांच्या घोडाझरी पाणी संघर्ष समितीच्या वतीने गोसीखुर्द धरणाचे पाणी घोडाझरी तलावात आणण्याकरिता चिमूर क्षेत्राचे खासदार अशोक नेते ...

अशोक नेते : घोडाझरी विकास परिषदेत आंदोलनाचा इशारातळोधी (बा.): तळोधी (बा.) परिसरातील शेतकऱ्यांच्या घोडाझरी पाणी संघर्ष समितीच्या वतीने गोसीखुर्द धरणाचे पाणी घोडाझरी तलावात आणण्याकरिता चिमूर क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या उपस्थितीत नुकतीच घोडाझरी विकास परिषद तळोधी (बा.) येथे पार पडली. या घोडाझरी विकास परिषदेत गोसीखुर्द धरणाचे पाणी घोडाझरी तलावात सोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका खासदार अशोक नेते यांनी घेतली.या विकास परिषदेला भाजपा तालुका अध्यक्ष होमदेव मेश्राम, तालुका सरचिटणीस गजानन पाथोडे, जिल्हा महामंत्री संजय गजपुरे, पं.स. सदस्य दिवाकर कामडी, नागभीड आणि सिंदेवाही तालुक्यातील ५२ गावांचे शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. याप्रसंगी प्रास्ताविक भाषणातून ईश्वर कामडी यांनी १ नोव्हेंबर २०१५ ला घोडाझरी पाणी प्रश्नांवर पहिली विकास परिषद घेतली. त्यावेळी शेतकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाची यादी वाचनू दाखवली तर भाजपाचे जिल्हा महामंत्री संजय गजपूरे यांनी घोडाझरी तलावाचा इतिहास, कमी पावसामुळे परिसरात निर्माण झालेला दुष्काळ, गोसीखुर्द धरणाचे कालवाच्या कामातील त्रुटी, यावर प्रकाश टाकला. गोसीखुर्द धरणाचे पाणी घोडाझरी तलावात टाकल्यास या परिसरातील शेतकऱ्यांना काय फायदा होईल, हे सांगून आजपर्यंत घोडाझरी तलावाच्या पाणी प्रश्नांवर शासनाने शेतकऱ्यांचे मतप्रदर्शन लक्षात घेतले असते आज ही वेळ आली नसती असे सांगून तलावात पाणी सोडण्यासोबत तलावाच्या वितरणिकाचे सिमेंटीकरण व साफसफाई किती आवश्यक आहे, हे खासदार नेते यांच्या निदर्शनात आणून दिले.यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना खासदार नेते यांनी आपण काम करणारा माणूस असून गोसीखुर्द धरणाचे पाणी घोडाझरी तलावात आणून सोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी शेतकऱ्यांना ग्वाही दिली व या संदर्भाचे गोसीखुर्द प्रकल्पाचा समावेश पंतप्रधान सिंचन योजनेत करावा, यासाठी दोन दिवसापूर्वीच पत्र दिल्याचे आवर्जुन सांगितले. घोडाझरी सिंचन क्षेत्रात ५२ गावांचा समावेश असून तलावात पाणी नसल्याने या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळाले नाही व एका पाण्याने पिक गेले. अशावेळी शेतकऱ्यांची काय अवस्था होते, याची मला जाणीव आहे. त्यामुळेच मी मागील दोन महिन्यात घोडाझरी पाणी प्रश्नांवर घेतलेली ही तिसरी बैठक असल्याचे सांगितले. राज्यशासन आणि केंद्र शासन शेतकऱ्याप्रति सकारात्मक आहे. परंतु त्यांना शेतकऱ्यांच्या सिंचन प्रश्नावर काम करण्यास पुरेसा वेळ मिळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी बोलताना नागभीड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी खासदारांकडे होमदेव मेश्राम यांनी करताच शेतकऱ्यांनी दुष्काळ नको, पाणी हवे अशाप्रकारची मागणी करुन त्यांना पुढे बोलूच दिले नाही. यावेळी उपस्थितांनी खासदार नेते यांना कमी खर्चात, कमी वेळात व जास्त कष्ट न घेता गोसीखुर्दचे पाणी घोडाझरी तलावात कसे सोडता येईल याची प्रतिकृतीच सादर केली. एकंदरीत या बैठकीला उपस्थित शेतकरी पाणी प्रश्नांवर आक्रमक व अभ्यासंपूर्ण तयारी करुन हजर असल्याचे चित्र पहावयास मिळाले. मात्र खासदारांनी दिलेली ग्वाही पुढील शेतीच्या हंगामापूर्वी पूर्ण करणार काय, राजकारणी व्यक्तीचे आश्वासन खरे मानायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. तरीही आश्वासनाची पूर्तता होईल काय, हे येणारा काळच सांगू शकते. (वार्ताहर)