शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

अखेरचा प्रवासही होतो येथे त्रासदायक !

By admin | Updated: March 1, 2015 00:44 IST

चंद्रपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या व तालुक्याचे ठिकाण असलेल्या सिंदेवाही नगराची अत्यंत दुर्दशा झाली आहे.

सिंदेवाही : चंद्रपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या व तालुक्याचे ठिकाण असलेल्या सिंदेवाही नगराची अत्यंत दुर्दशा झाली आहे. अंदाजे २५ हजार लोकसंख्या असलेल्या या नगरातील जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या अनेक समस्या व विकासाची कामे रेंगाळत आहे.मनुष्य समाज जीवनात वावरत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आयुष्याच्या शेवटच्याक्षणी इहलोकाची यात्रा सुखाची जावी अशी सर्वाची अपेक्षा असते. परंतु सिंदेवाही येथील स्मशानभूमीत उघड्यावरच अंत्यसंस्काराचा विधी पार पाडावा लागत आहे. स्वातंत्र्यानंतरही सिंदेवाही नगरात अद्यापही समस्या कायम आहेत. तालुक्याचे ठिकाण असलेले येथील स्मशानभूमी पाच वर्षापासून केवळ देखावा ठरलेली आहे. या स्मशानभूमीतील शवदाहिनी पाच वर्षापासून बेपत्ता आहे. तसेच टिन शेड दोन वर्षापासून तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे पावसाळ्यात टिन शेडमधून पाणी गळते. सद्य:स्थितीत स्मशानभूमीवरील तुटलेल्या टिन गायब झाल्या आहे. आता केवळ लोखंडी खांब उभे आहेत. अशा प्रतीकुल परिस्थितीत नागरिकांना उघड्यावरच अंत्यसंस्काराचा विधी पार पाडवा लागत आहे. स्मशानभूमी परिसराला संरक्षक भिंत नाही. स्मशानभूमीत वीज व्यवस्था नाही, त्यामुळे रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. स्थानिक प्रशासनाने या स्मशानभूमीत शवदाहिनी व टिन शेड लावण्याचे सौजन्य दाखविले नाही. शासन जनतेच्या विकासासाठी वर्षानुवर्षे लाखो रुपये खर्च करीत असले तरी गावाचा विकास मात्र होत नसल्याचे दिसून येते. या स्मशानभूमीत शवदाहिनी व शेडवर टिनाची नवीन पत्रे बसविणे, विद्युत व्यवस्था, स्मशानभूमीवरील जागेवरचे अतिक्रमण हटविणे तसेच शोकसभा घेण्याकरिता सभागृह बांधणे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)